महिलांकडून 498 अ कलमाचा गैरवापर


सर्वोच्च न्य्यायालयाने नोंदवले निरीक्षण

Advertisement

नवी दिल्ली
घरगुती हिंसाचार 498 अ हे कलम सर्वात दुरुपयोग केलेल्या कलमांपैकी एक आहे.असे मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे या कलमाची दीर्घकाळापासून चर्चा सुरू आहे. स्त्रिया अनेकदा या कलमाचा गैरवापर करून पती आणि सासरच्या मंडळींना खोटय़ा गुन्हात अडकवतात.भारतीय दंड संहितेचे कलम 498 अ (विवाहित महिलांवरील अत्याचार) या कलमाचा घरगुती हिंसाचारासाठी सर्वाधिक गैरवापर करण्यात आला आहे. हे कलम महिलांच्या सुरक्षेसाठी बनवण्यात आले होते. परंतु महिलांनी या कलमाचा गैरवापर केला आहे, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. न्यायमूर्ती बी. आर. गवई, प्रशांतकुमार मिश्रा आणि के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाने हे निरीक्षण नोंदवले आहे. या प्रकरणांमध्ये पती-पत्नी या दोघांना स्वतंत्र करणे हाच यावर सर्वोत्तम पर्याय आहे, असे कोर्टाने म्हटले.
मुंबई उच्च न्यायालयात एका प्रकरणावर सुनावणी करताना आजी-आजोबा आणि अंथरुणाला खिळलेल्या व्यक्तींनाही अडकवल्याबद्दल कोर्टाने चिंता व्यक्त केली होती. कलम 498 अ गुह्याला तडजोडीचा गुन्हा केले तर हजारो प्रकरणे निकाली काढता येतील, असे हायकोर्टाने म्हटले होते. केरळ आणि झारखंड उच्च न्यायालयानेसुद्धा या कलमाचा गैरवापर होत असल्याचे म्हटले होते


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!