सलीम-जावेद पुन्हा एकत्र
हिट लेखक जोडी लिहिणार चित्रपटकथा
मुंबई
अंदाज , जंजीर , सिता और गिता, शोले , दिवार यांसारख्या सुपरहिट सिनेमांना घडवणारी जोडी म्हणजे सलीम-जावेद लेखक म्हणून ‘सलीम-जावेद’ यांनी भारतीय सिनेमांमध्ये विशेषत: बॉलीवूड सिनेमांचा एका काळ घडवला.सलीम-जावेदच्या जोडीने मिस्टर इंडिया हा शेवटचा सिनेमा लिहिला होता. त्यामुळे त्यानंतरच्या अनेक पिढ्यांना या जोडीच्या लिखाणाची जादू तशी अनुभवता आली नाही. पण आता एक आनंदाची बातमी समोर येत आहे. कारण सलीम-जावेद ही जोडी लवकरच एक सिनेमा लिहिणार आहे आणि ही घोषणा स्वत: जावेद अख्तर यांनी केली आहे.
सिनेमातील नायकापेक्षाही लेखक म्हणून सर्वाधिक मानधन घेणाऱ्या या जोडीचा प्रवास हा आता डॉक्युमेंट्रीमधून उलगडण्यात येणार आहे. तीन भागांची ही डॉक्युमेंट्री असणार आहे. नुकतच या डॉक्युमेंट्रीचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला. त्यावेळी जावेद अख्तर आणि सलीम खान हे स्वत: उपस्थित होते. याचवेळी जावेद अख्तर यांनी ही घोषणा केली.
जावेद अख्तर यांनी यावेळी बोलताना म्हटलं की, मी आता तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो की, आता आम्ही दोघंही एकत्र लिहिणार आहोत.मी सलीमला म्हटलं की, चलो एक और पिक्चर साथ में लिखते हैं. त्यावेळीही आमचं मानधन सगळ्यात जास्त होतं आणि आताही आमचं मानधन जास्त असेल, हे फक्त लक्षात ठेवा, असंही मिश्किलपणे जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे
