अविनाश साबळेची फायनलमध्ये धडक


पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये तगड्या स्पर्धकांना टक्कर

Advertisement

मुंबई
पॅरिस ऑलिम्पिक लक्ष्य सेन आणि निशा दहिया यांना पदकाने हुलकावणी दिल्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सुपूत्राने पदकाच्या आशा पल्लवित केल्या आहेत. मैदानी स्पर्धेत सर्वांच्या नजरा धावपट्टू अविनाश साबळे याच्याकडे लागल्या होत्या.अखेर पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस प्रकारात तगड्या स्पर्धकांना टक्कर देत त्याने फायनलमध्ये धडक मारली आहे.
अविनाश साबळेला त्याच्या गटात केनियाचा अब्राहम किविबोट, इथोपियाचा सॅम्युअल फिरेवू आणि जपानचा रियूजी मियूरा अशा आघाडीच्या खेळाडूंचे आव्हान होते. अविनाश जागतिक क्रमवारीत 15व्या क्रमांकावर आहे. 8 मिनिटे 9.91 सेकंद ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक वेळ आहे. प्रत्येकी 5 असे 15 खेळाडू फायनलसाठी पात्र ठरणार होते.या स्पर्धेत अविनाश साबळेने सुरुवातीपासून आघाडी घेतली. प्रतिस्पर्धी अब्राहम आणि सॅम्युअल त्याच्या मागोमाग होते. पण, 1000 मीटर नंतर अविनाश तिसऱ्या क्रमांकावर ढकलला गेला. थोड्या अंतरानंतर जपानच्या खेळाडूने अविनाशला मागे टाकलं. 2000 मीटर अंतर संपेपर्यंत अविनाश जोरदार पुनरागमन करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. तो दुसऱ्या स्थानावर येऊन पोहोचला. अब्राहम वारंवार मागे वळून जवळ येणाऱ्या अविनाशकडे पाहत होता. मात्र, फिनिश पॉईंटच्या जवळ येताना अविनाश मागे पडला. अविनाशने पाचव्या स्थानासह फायनलमधील आपली जागा निश्चित केली आहे. आता अविनाश कोणतं पदक मिळवतो? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!