बारामतीत लाडकी सुनबाई योजना


सासुबाईंच्या जेवणावर सुनबाईचे जेवण फ्री

पुणे
महाराष्ट्रात सध्या माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा आहे. बारामतीमध्ये हॉटेल राजवाडा पार्कचे मालक आनंद सावंत यांनी त्यांच्या हॉटेलसाठी या योजनेचा प्रसिद्धीचा आवाका लक्षात घेत नवा फंडा शोधला. हॉटेलमध्ये नव्याने ग्राहक शोधण्यासाठी याच योजनेची कॉपी करत लाडकी सुनबाई स्कीम जेवणासाठी तयार केली. यामध्ये सासुबाईंच्या जेवणावर, सुनबाईचे जेवण फ्री असा बॅनर लावला.

Advertisement

या स्कीमची चर्चा झाली मग आनंद सावंतांनी तेवढ्यावर न थांबता थेट शहरात रिक्षाच फिरवली. सध्या ही रिक्षा आणि तिच्यावरचा बॅनर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. अर्थात या योजनेमध्ये आवश्यकतेनुसार काही अटीही आहेत.
या अटीमध्ये हॉटेलला जाताना फक्त नवरा बायकोने जायचे नाहीये.. यामध्ये सासुबाईंना जेवायला घेऊन येणे बंधनकारक आहे. शिवाय सासुबाईंना जी देणार तीच थाळी सुनबाईंना फ्री मिळणार, त्यामुळे आपण जे खाऊ ते सासूबाईंनी खाल्ले पाहिजे आणि सासुबाई ज्या खातील तेच आपल्याला मिळणार हे सुनबाईने लक्षात घ्यावे कमीत कमी घरामधील पाच लोकांना जेवायला घेऊन यावे.असा उल्लेखही त्या बॅनरवर केला आहे.सध्या या बॅनरची जोरदार चर्चा सुरू आहे.
या ऑफर बाबत आनंद सावंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यामागचा हेतू सांगितला. सध्या अनेक घरांमध्ये सासू आणि सुनांमध्ये चांगला संवाद असतो. नाती देखील चांगली जपली जातात. अशा कुटुंबांसाठी ही योजना लाभदायी आहेच, शिवाय ती आमच्या व्यवसायासाठी सुद्धा उपयुक्त आहे. परंतु काही ठिकाणी क्षुल्लक गोष्टीवरून सासु व सुनेमध्ये मध्ये वादविवाद होत असतात. त्या कुठेतरी एकत्र येऊन पार्टी एन्जॉय करतील, त्यासाठी ही ऑफर लावण्यात आली आहे. आणि या ऑफरचा खरंच आम्हाला आणि जेवायला येणाऱ्या कुटुंबालाही फायदाही होतोय आणि समाधानही वाटत आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!