घडतं ते चांगल्यासाठीच
न्यूजमंडी/पॉझिटिव्ह
वयाच्या 17 व्या वर्षी वकिलीची परीक्षा पास
कॅलिफोर्नियातील विद्यार्थ्याने नोंदवला विक्रम

वॉशिंग्टन
सर्वसाधारणपणे कोणतीही पदवी मिळवण्यासाठी वयाची वीस वर्षे पार करणे आवश्यक असते पण कॅलिफोर्नियातील एका विद्यार्थ्याने मात्र पराक्रम केला असून त्याने वयाच्या 17 व्या वर्षी वकिलीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे तुलारे डिस्ट्रिक्ट ॲटर्नी ऑफिसने याबाबत परिपत्रक प्रसिद्ध केले असून पीटर पार्क नावाच्या विद्यार्थ्याने वयाच्या 17 व्या वर्षीच बारची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे त्यांनी या परिपत्रकात म्हटले आहे अशा प्रकारची परीक्षा उत्तीर्ण होणारा पीटर पार्क हा सर्वात लहान विद्यार्थी आहे की नाही याबाबत आम्हाला कल्पना नाही पण त्याने वयाच्या 17 व्या वर्षीच वकिलीची परीक्षा उत्तीर्ण केली असून त्याने वकील म्हणून काम करण्याची अधिकृत शपथही घेतली आहे पीटर पार्कने यावर्षीच्या जुलै महिन्यामध्ये परीक्षा दिली होती नोव्हेंबरमध्ये या परीक्षेचा निकाल लागून त्याला या परीक्षेत चांगले यश मिळाल्याचे लक्षात आले वयाच्या 13 व्या वर्षापासूनच पीटर पार्कने पदवी परीक्षेचा अभ्यास सुरू केला होता नॉर्थ वेस्टर्न कॅलिफोर्निया यूनिवर्सिटी मध्ये त्याने हा चार वर्षाचा वकिलीचा अभ्यासक्रम सुरू केला होता आणि त्यामध्ये कोणताही अडथळा न येता वयाच्या 17 व्या वर्षी हा अभ्यासक्रम पूर्ण करून वकील होण्याचा मान मिळवला डिस्ट्रिक्ट ऍटर्नी कार्यालयाने त्याला गेल्या महिन्यात शपथ देऊन अधिकृतरित्या वकील म्हणून सामावून घेतले आहे

न्यूजमंडी/ज्ञानकोश
निवडणूक खर्च
निवडणुकीच्या दरम्यान उमेदवारचा होणारा खर्च हा चेकच्या माध्यमातून केला जाणे अपेक्षित आहे. निवडणूक काळात किरकोळ रक्कम जिथे चेक देणे अशक्य आहे. यासाठी संपूर्ण निवडणूक कालावधीमध्ये उमेदवारांनी 20000 रुपये खर्च करणे अपेक्षित आहे. ही रक्कम निवडणूक खर्चासाठी उघडलेल्या बँक खात्यातूनच काढलेली असावी. खर्चाचा सर्व तपशील आयोगाच्या नियमानुसार निवडणूक निरीक्षकाकडे सादर करावा लागेल. निवडणूक काळात कोणत्याही उमेदवारास 10,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम दान अथवा कर्ज म्हणून घेता येणार नाही. सदर रक्कम उमेदवारा चेक, धनादेश, अथवा खांत्यामध्ये ट्रान्सफर करणे आवश्यक आहे. तसेच ज्याच्याकडून ही रक्कम मिळाली आहे. त्याचे नाव आणि सविस्तर पत्ता नमूद करणे आवश्यक आहे. निनावी रक्कम स्वीकारता येणार नाही. तसेच अशा प्रकारे प्राप्त झालेल्या निवडणूक निंधीची नोंद करणे आवश्यक आहे.उमेदवाराने निवडणूक काळात केलेल्या खर्चावर निवडणूक आयोगाच्या वतीने स्वतंत्र यंत्रणेकडून लक्ष ठेवले जाते. यामध्ये निवडणूक खर्च अधिकाऱ्यांच्या अख्यत्यारीत राज्यातील विविध यंत्रणा कार्यरत असतात. त्यामध्ये रिटर्निंग ऑफिसर, विक्रीकर अधिकारी, आयकर विभागातील अधिकारी, भरारी पथक, यासह स्वतंत्र व्हिडिओ रेकॉर्डिग पथक, लेखा अधिकारी, बूथ स्तरीय जनजागृती पथक यांच्या माध्यमातून खर्चावर लक्ष ठेवले जाते. यामध्ये निवडणूक खर्च अधिकाऱ्यांची प्रमुख भूमिका आहे. निवडणूक खर्च निरीक्षकाच्या निगरणाखाली उमेदवाराच्या दैनदिन खर्चाचे परिक्षण केले जाते. यासाठी उमेदवारांनी संपूर्ण निवडणूक काळात किमान तीन वेळा निवडणुकीतील खर्चाचे रजिस्टर निवडणूक खर्च निरीक्षकांकडे पडताळणीसाठी देणे आवश्यक आहे.

न्यूजमंडी/सुविचार
१. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी एखादा दिवस किंवा वर्षही लागेल. मात्र जे मिळवायचे आहे त्याचा मार्गा नक्कीच मिळेल.
२. जीवनाची खरी सुरुवात तेव्हाच होते जेव्हा आपण आपला कम्फर्ट झोन सॊडतो.
३. दररोज सकाळी उठल्यानंतर स्वतःला ही आठवण करून दद्या की मला जे मिळवायचे आहे, ते मी मिळवू शकतो.

न्यूजमंडी/विनोद
गप्पा
तीन उंदीर गप्पा मारत असतात.
पहिला – मी विषारी गोळ्या आरामात चघळतो.
दुसरा – मी पिंजऱ्यातील पनीर आरामात खाऊन बाहेर येतो.
तिसरा लगेच उठतो आणि जायला लागतो,
पहिला आणि दुसरा विचारतात,
काय झालं कुठ चालला…?
तिसरा – आलोच, मांजरीचा कीस घेऊन…
पाढा
2 चा पाढा एका कागदावर लिहून
तो जाळल्यास जी राख तयार होते
तिला ‘बेचिराख’ म्हणतात!
शपथ काय काय सुचायला लागलय बसल्या बसल्या !
पाप
भक्त – देवा,
मी पापी आहे.
मला दुःख द्या.
दर्द द्या. मला बरबाद करून टाका.
माझ्यामागे भूत सोडा…
देव – नाटक का करतोयस…!
सरळ सरळ सांग ना, तुला बायको पाहिजे.

न्यूजमंडी/खाद्ययात्रा
रसीली आलू गोभी
साहित्य
लहान फुलकोबी ३ बटाटे 1 चमचा मोहरीचे तेल हिंग, 1 /2 tsp मोहरी, 1/2 tsp जिरे थोडी कढीपत्ता 1 टीस्पून आले, 1 tsp लसूण पेस्ट 1 छोटा चिरलेला कांदा 1/2 tsp हळद 1 tsp धणेपूड घाला 2 चिरलेला टोमॅटो 1 ग्लास पाणी 1 चमचा किचन किंग गरम मसाला कोथिंबीर
कृती
प्रथम एक लहान फुलकोबी आणि तीन बटाटे चिरून घ्या आणि पाच मिनिटे उकळवा. नंतर कुकर गरम करून त्यात एक चमचा मोहरीचे तेल घालून त्यात हिंग, मोहरी, जिरे आणि थोडी कढीपत्ता घाला.दोन मिनिटांनंतर एक टीस्पून आले, लसूण पेस्ट घाला आणि एक छोटा चिरलेला कांदा घाला आणि हलवा नंतर हळद आणि धणेपूड घाला आणि एक मिनिटानंतर चिरलेला टोमॅटो घाला आणि पुन्हा मिक्स करा नंतर बटाटे आणि फ्लॉवर घाला, सर्वकाही चांगले मिसळा नंतर मीठ घाला.नंतर त्यात एक ग्लास पाणी आणि एक चमचा किचन किंग गरम मसाला घालून कुकरचे झाकण लावा आणि सिम फ्लेमवर एकच शिट्टी द्या नंतर गॅस बंद करा.पाच मिनिटांनी झाकण उघडा. भाजीला कोथिंबीर चिरून सजवा आणि पराठे आणि कोशिंभिरासोबत सर्व्ह करा.

न्यूजमंडी/भविष्य
मेष मित्र मैत्रिणींच्या गाठीभेटी होतील.
वृषभ कामातूनच आर्थिक लाभ देखील संभवतात.
मिथुनआजच्या दिवसाचे योग्य नियोजन करा
कर्क विनाकारण वाद-विवाद, कटकटी यासारखे प्रसंग टाळा.
सिंह आज जोडीदाराचे भरभरून प्रेम व सहकार्य लाभेल
कन्या आज आरोग्याच्या काही कुरबुरी जाणवतील.
तुळ आजच्या दिवशी उत्तम संततीसौख्याची प्राप्ती कराल
वृश्चिक आजच्या दिवशी उत्तम गृह सौख्य लाभेल.
धनु उपजत कलेच्या माध्यमातून अर्थार्जनही कराल.
मकर आज काही धनप्राप्तीचे योग देखील संभवतात.
कुंभ आज स्वत:साठी वेळ काढाल.
मीन आज हिशोबी वृत्तीने वागणे श्रेयस्कर ठरेल
