गीत गाता चल कराओके ग्रुपतर्फे हिंदी गीतांचा कार्यक्रम


लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि कल्याणजी आनंदजी यांच्या हिट गाण्यांची मेजवानी
सातारा
सातारा येथील गीत गाता चल कराओके ग्रुपच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त रविवार दिनांक 4 रोजी सायं 5 कन्याशाळा, राजपथ सातारा येथे कल्याणजी आनंदजी आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या हिट गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
या कार्यक्रमात सदर गीतांना मुकुंद पांडे, एडवोकेट लक्ष्मीकांत अघोर, प्रशांत कुलकर्णी, आशुतोष देशपांडे, अरुण कुलकर्णी, प्रकाश कुलकर्णी, एडवोकेट अमोल चिकणे, एडवोकेट इंद्रजीत बेंद्रे, एडवोकेट आशुतोष वाळिंबे, अनंत जोशी, डॉक्टर विलास माने, डॉक्टर लियाकत शेख, प्रिया अघोर, सुषमा माने, एडवोकेट रेशमा वाळिंबे, मधु गिजरे, विजया चव्हाण, सुषमा बगाडे, डॉक्टर शिल्पा देसाई हे कलाकार स्वरसाज चढवणार आहेत. ध्वनी व्यवस्था कुलदीप पवार यांची असून, निवेदन हे जाहीद शेख यांचे असणारे आहे. सदर कार्यक्रम हा सर्व रसिकांना विनामूल्य असून सर्व सातारकर रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन गीत गाता चल ग्रुप तर्फे करण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!