विद्यार्थ्यांसाठी कोडींग वर्कशॉप
रयत सायन्स अँड ऍक्टिव्हिटी सेंटरचा उपक्रम
सातारा
रयत शिक्षण संस्थेच्या रयत सायन्स आणि इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटर आणि आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी कोडींग वर्कशॉप आयोजित करण्यात आले आहे सातवी ते बारावी या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी हे वर्कशॉप 13 ते 17 मे या कालावधीमध्ये आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल सातारा येथे होणार आहे विद्यार्थ्यांनी या वर्कशॉपमध्ये भाग घेतल्यानंतर येताना स्वतःचा लॅपटॉप घेऊन यायचा आहे या वर्कशॉप साठी बाराशे रुपये शुल्क आकारण्यात आले असून अधिक माहितीसाठी रयत ऍक्टिव्हिटी सेंटरचे इन्चार्ज डायरेक्टर डॉक्टर सारंग भोला आणि अप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्य मेघा पवार यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे
