ब्लू व्हेल गेमचा आणखी एक बळी


महाराष्ट्रात 10वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

Advertisement

मुंबई
सध्या लहान मुलांमध्ये मोबाईल बघण्याचे प्रमाण जास्त वाढले आहे. त्यामध्ये गेम खेळताना तर त्यांना काहीच सुचत नाही.कोणत्याही पातळीवर जाऊन ते टास्क पुर्ण करण्याच्या मार्गावर असतात. अशीच एक घटना पुणे जिल्ह्यात घडली आहे. 10वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने गेमचे टास्क पूर्ण करण्यासाठी 14व्या मजल्यावरून उडी मारली आहे. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांनी मृत विद्यार्थ्याच्या खोलीतून एक कागद जप्त केला आहे. त्यावर त्याच्या गॅलरीतून उडी मारण्याचे टास्क पेन्सिलने रेखाटण्यात आले होते. तसेच या पेपरमध्ये त्यांने लॉगआउट असे देखील लिहिले आहे. असे गेमच्या कोडिंग भाषेत लिहिलेले अनेक पेपर त्याच्या खोलीत सापडले असून पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करून गेमचा तपास सुरू केला आहे.
10वीत शिकणाऱ्या किशोर नावाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. त्यापुर्वी त्याने एक नोट देखील लिहिली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील किवेल परिसरात त्याने आपल्या राहत्या इमारतीच्या 14व्या मजल्यावरून ऑनलाइन गेम खेळत उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. तसेच पोलिसांना जी नोट मिळाली, त्यामध्ये त्याने लॉगआऊट असे लिहून आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे. यावेळी त्याने आपल्या वहीत काही स्केचेस बनवले होते, त्यामुळे त्याला गेमचे व्यसन लागल्याने त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तसेच किशोरच्या लॅपटॉपचा पासवर्ड पोलिसांना अद्यापही कळालेला नसून तो कोणता गेम खेळत होता, याचा तपास पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून सुरु आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!