संस्कार भारतीच्या कार्यकारिणी निवडी
सातारा जिल्हा संस्कारभारती अध्यक्षपदी दिलीप चरेगावकर
सोलापूर
संस्कारभारती पश्चिम महाराष्ट्र प्रांताची वार्षिक सर्वसाधारण सभा सोलापुरात संपन्न झाली,या सभेमध्ये पुढील तीन वर्षांसाठी प्रांताची मध्यवर्ती कार्यकारिणी व इतर जिल्यातील अनुक्रमे अध्यक्ष, सचिव व कोषाध्यक्ष ह्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या
सातारा जिल्हा संस्कारभारती अध्यक्ष” म्हणून दिलीप चरेगावकर यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली
तसेच सातारा जिल्हा संस्कारभारती सचिव म्हणून श्री रुपेश कुंभार,कोषाध्यक्ष म्हणून श्री विजय कुलकर्णी व जिल्हा संयोजक म्हणून श्री प्रदीप इनामदार ह्यांची ही निवड झाली आहे
