युनिव्हर्सलच्या श्रुती कुंभारची गरूडझेप
फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात निवड
सातारा
युनिव्हर्सल नाॅलेज स्कूलमधील इयत्ता दहावीतील विद्यार्थीनी श्रुती कुंभार हिची बेळगाव (कर्नाटक) येथे ज्युनियर गर्ल्स फुटबॉल चॅम्पियनशिप-२०२४-२५ या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली आहे.दि.२७ जुलै ते ९ ऑगस्ट दरम्यान हि स्पर्धा होणार आहे खडतर परिश्रमानेच असाध्य गोष्टी साध्य करता येतात याचे उत्तम उदाहरण तिने इतर विद्यार्थ्यांसमोर ठेवले आहे.तिच्या या उत्तुंग यशामध्ये सातारा फुटबॉल असोसिएशन्सचे प्रमुख श्री.शिवराज गायकवाड सर यांचे तिला मोलाचे सहकार्य लाभले.युनिव्हर्सल नाॅलेज स्कूलचे चेअरमन श्री.नितीन माने,उपप्राचार्या सौ.रोशनी चंदनखेडे,क्रिडाशिक्षक श्री.अभिजीत जाधव,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
