‘युनिव्हर्सल नाॅलेज स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना पोस्कोची माहिती
सातारा
युनिव्हर्सल नाॅलेज स्कूल,वर्ये,सातारा येथे शाळेचे चेअरमन श्री.नितीन माने यांच्या मार्गदर्शाखाली पोस्को कायदा २०१२ (लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२) या विषयावर विद्यार्थ्यांसाठी माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुण्या शाळेच्या पालक ॲड.सौ.राजश्री सावंत यांचे ‘सीड बाॅल’ देऊन स्वागत केले.यानंतर त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना संबंधित कायद्याविषयी पी.पी.टी द्वारे माहिती,कायद्यातील तरतुदी तसेच विद्यार्थ्यांनी या बाबतीत कसे सजग राहावे याविषयी सखोल माहिती दिली.कार्यक्रमादरम्यान शाळेतील व्यवस्थापन समितीच्या सदस्या नाझिया मुलाणी यांनी सूत्रसंचालनाचा कार्यभार सांभाळला.यावेळी उपप्राचार्या सौ.रोशनी चंदनखेडे,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी या सत्रासाठी उपस्थित होते.उपप्राचार्या सौ.रोशनी चंदनखेडे यांनी प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले.
