प्रा. दशरथ सगरे ‘लोकगौरव’ पुरस्काराने सन्मानित


सातारा
शिक्षण व सामाजिक सेवेतील मोलाच्या योगदानाबद्दल यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे यांना ‘लोकगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. लोकमान्यचे प्रमुख आणि दैनिक तरुण भारतचे सल्लागार संपादक किरण ठाकूर यांच्या हस्ते प्रा. सगरे यांचा गौरव करण्यात आला प्रा. सगरे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार तांत्रिक शिक्षण मिळावे या उद्देशाने यशोदा टेक्निकल कॅम्पसची स्थापना केली. त्यांचा शिक्षणप्रेम, सामाजिक बांधिलकी व नेतृत्वगुण हे त्यांच्या कार्यातून नेहमीच प्रत्ययास आले आहेत.’लोकगौरव’ हा पुरस्कार त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाची पावती असून, या पुरस्काराने ते सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत त्यांच्या कार्याचा लोकमान्य परिवाराने केलेल्या गौरव त्यांच्या भविष्यातील शैक्षणिक आणि सामाजिक बदलांच्या योजनांना उभारी देणारा असा आहे. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना प्रा. सगरे म्हणाले, “हा पुरस्कार माझ्या कार्याची पावती आहे. समाजासाठी काहीतरी देण्याची भावना नेहमीच मनात होती आणि तीच प्रेरणा घेऊन मी काम करत राहीन.” कर्मवीर डॉक्टर भाऊराव पाटील, कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे, बापूजी साळुंखे यांना अपेक्षित असणारी शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याचा आणि त्यांच्या आदर्श कार्यकर्तृत्वाचा मागोवा घेण्याचे कार्य आपण करणार आहोत
प्रा. दशरथ सगरे यांनी प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाची आणि सर्वसामान्यांना सामावून घेणारी व्यवस्था निर्माण केल्यानंतरसुद्धा एक गोष्ट नेहमी सतावत होती ती म्हणजे ग्रामीण भागातील मुलांचे पुण्या-मुंबईसारख्या शहराकडे असणारे आकर्षण कारण एकच, मेट्रो सिटी तील शैक्षणिक सुविधा सातारा सारख्या ग्रामीण भागात कुठे.? आणि मग आर्थिक परिस्थिती नसणारे पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी तर सुविधाच नाहीत. याच विचारातून सन 2011 साली सगरे सरांनी यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. गरिबातील गरीब, होतकरू, गरजू विद्यार्थ्यांना परवडेल अशा प्रकारचं तंत्रशिक्षण अगदी माफक खर्चामध्ये मध्ये उपलब्ध करून देण्याची किमया त्यांनी करून दाखवली. यशोदा इन्स्टिट्यूट सातारा म्हणजे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार आणि बदलांना सामोरे जाणार अत्याधुनिक व्यवसायिक- तंत्रशिक्षण देणारे विद्या संकुल. पारंपरिक शिक्षण व्यवस्थे समोरील आव्हाने आणि काळाची पावले अचूक ओळखून यशोदा इन्स्टिट्यूट ची निर्मिती झाली. स्थापत्य वास्तुकला शास्त्र, अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्र, व्यवस्थापन व संगणक शास्त्र अशा विद्याशाखांतील पदविका, पदवी आणि पदव्युत्तर पदवी असे विविध स्तरावरील शिक्षण एकाच कॅम्पसमध्ये उपलब्ध करून देण्याची किमया यशोदा इन्स्टिट्यूट सातारा मध्ये साकार झाली आहे.
बदलत्या परिस्थितीला अनुरूप असणारे नवनवीन अभ्यासक्रम या ठिकाणी उपलब्ध आहेत ज्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स, मशीन लर्निंग इत्यादी अत्याधुनिक असणारे अभ्यासक्रम या ठिकाणी उपलब्ध आहेत, आवश्यक असणारे प्रत्येक संसाधन करून देण्यावर सगरे सरांनी विशेष भर दिला. उच्चविद्याविभूषित अध्यापक वर्ग, प्रचंड मेहनतीतून विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे ज्ञानार्जनाची कार्य अखंडपणे करताना दिसतात. संस्थेच्या स्थापनेच्या अगदी कमी कालावधी मध्ये राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेकडून मानांकन प्राप्त झाले असल्यामुळे संस्थेतील गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि त्यांना देण्यात येणाऱ्या दर्जेदार सुविधा यांची उपलब्धता अधोरेखित होते. सोबतच हे मानांकन म्हणजे व्यवस्थापनातील काटेकोरपणा आणि उच्चतम भौतिक सुविधा याचे प्रत्यंतर आहे. संस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचे शिक्षण घेणारा विद्यार्थी हा कुशल बनावा यासाठी स्वतंत्र ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल ची स्थापना करण्यात आली आहे.ज्याच्या माध्यमातून इथे प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थी त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणारे शिक्षण व कौशल्य विकासावर आधारित उपक्रम यामध्ये सहभागी होऊन शैक्षणिक टप्पा पूर्ण होताच विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीची संधी सहजपणे उपलब्ध करून घेऊ शकतात.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!