भारतीय महिलांकडे प्रचंड सोने


जगातील एकूण साठ्यापैकी भारतीय महिलांकडे 11 टक्के सोने

नवी दिल्ली

Advertisement

भारतात लग्नकार्य असो वा इतर कार्यक्रम, घरातील महिलांची पहिली पसंती ही सोन्याच्या दागिन्यांना असते. आपल्या देशातील महिलांकडे किडूक-मिडूक का असेना पण सोने असते. सोने हा महिलांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या एका अहवालानुसार, भारतीय महिलांकडे जवळपास 24,000 टन सोने आहे. हे सोने म्हणजे जगातील सर्वात मोठी सोन्याची खाण आहे. खजिना आहे. या अहवालानुसार,जगातील एकूण सोन्याच्या साठ्यापैकी भारतीय महिलांकडे 11 टक्के सोने आहे. अर्थात ते दाग-दागिने, बिस्किट, वीटा, नाणे अशा कोणत्याही स्वरुपात असेल. भारतीय महिलांकडे जितके सोने आहे, ते जगातील टॉप 5 देशांकडील सोन्याच्या साठ्यापेक्षा अधिक आहे.
अमेरिकेकडे एकूण 8000 टन सोने तर जर्मनीकडे 3,300 टन सोने आहे. याशिवाय इटलीकडे 2450 टन, फ्रान्स देशाकडे 2400 टन आणि रशियाकडे 1900 टन सोने आहे. त्यामानाने भारतीय महिलांकडे कित्येक पटीने अधिक सोने आहे. सोन्याची ही दौलत जगातील महासत्तांकडे पण नाही.भारतात सोन्याचा सर्वाधिक वापर दक्षिणेत होतो. भारतातील दक्षिण राज्यातील महिला सोन्याचा सर्वाधिक वापर करतात. त्या सोन्याचे दागदागिने वापरतात. दक्षिण भारतात देशातील एकूण सोन्याच्या 40 टक्के सोने आहे. केवळ तामिळनाडूमध्ये 28 टक्के सोने आहे.भारतात चित्रपटातील अभिनेत्री असोत वा मोठ-मोठ्या उद्योगपती, कॉर्पोरेट कुटुंबातील महिला, अशा विशेष प्रसंगात सोन्याची दागिने वापरणे पसंत करतात. आपल्या देशात सण उत्सावाला सोने खरेदीचा प्रघात आहे. त्यामध्ये अक्षय तृतीया आणि दिवाळी यांना विशेष महत्व आहे. या कालावधीत सोन्याची मोठ्या प्रमाणात विक्री होते.सोन्याच्या दाग-दागिने खरेदीवर सर्वाधिक खर्च होतो.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!