जगातील सर्वात श्रीमंत गाव भारतात
गावकऱ्यांच्या नावे आहेत कोट्यवधींच्या ठेवी
नवी दिल्ली
जगातलं सर्वांत श्रीमंत गाव अमेरिका, अरेबियन देशात किंवा युरोपात नसून आपल्या भारतात आहे. या गावातल्या नागरिकांच्या एकूण 17 बँकांमध्ये 5000 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत, यावरून त्यांच्या आर्थिक स्थितीचा अंदाज लावता येऊ शकतो जगातल्या सर्वांत श्रीमंत गावाचं नाव ‘माधापार’ असं आहे. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात हे गाव आहे. माधापार गावात सुमारे 7,600 घरं आणि 17 बँका आहेत. विशेष म्हणजे गावातल्या प्रत्येक कुटुंबातले अनेक सदस्य लंडन, अमेरिका, कॅनडा आणि इतर देशांमध्ये राहतात.
या गावाच्या समृद्धीमध्ये शेतीचा मोठा वाटा आहे. तिथे पिकवलेला कृषी माल मुंबईला निर्यात केला जातो. माधापार गावात शाळा-कॉलेजसह एक आधुनिक गोशाळादेखील आहे. या गावात जागतिक दर्जाच्या सुविधा असलेलं आरोग्य केंद्र आहे. नवीन तलाव, चेक डॅम्स आणि बोअरवेलमुळे या ठिकाणी वर्षभर शुद्ध पाणी उपलब्ध असतं.1968मध्ये लंडनमध्ये ‘माधापार व्हिलेज असोसिएशन’ नावाची संघटना स्थापन झाली आहे. माधापार गावातल्या लोकांना एकमेकांना भेटता यावं यासाठी या संस्थेचं कार्यालयही उघडण्यात आलं. लंडनशी थेट संपर्क ठेवता यावा यासाठी गावातदेखील एक कार्यालय सुरू करण्यात आलं आहे.
या गावाला मोठा इतिहासही आहे. एरव्हीही गुजरात अनेक कारणांवरून चर्चेत असतं. जगातल्या सर्वांत श्रीमंत गावामुळेदेखील गुजरातची चर्चा होते.
