मधुसूर राज्यस्तरीय आंतरशालेय सुगम संगीत स्पर्धा


नानासाहेब द्रविड यांचे स्मरणार्थ उपक्रम
सातारा
सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे समाजभूषण स्वर्गीय काशिनाथ गणेश उर्फ नानासाहेब द्रविड यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू ऍड रविवार अमित द्रविड यांनी राज्यस्तरीय मधुसूर आंतरशालेय सुगम संगीत स्पर्धा 2024 आयोजित केली आहे युवा पिढीला भारतीय संगीत क्षेत्रात नवीन व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न आहे या स्पर्धेच्या पहिल्या प्रवास स्पर्धकांचा उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रतिसाद लाभल्याने ही स्पर्धा यावेळी राज्यस्तरीय करण्यात आली असून सर्व शाळांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन ऍड अमित द्रविड यांनी केले आहे शनिवार दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी नऊ वाजता ही स्पर्धा होणार असून त्यामध्ये बाल गट आणि कुमार गट असे दोन गट ठेवण्यात आले आहेत बालगटामध्ये इयत्ता तिसरी ते सातवीतील विद्यार्थ्यांना भाग घेता येईल तर कुमार गटामध्ये आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल या स्पर्धेतील प्रत्येक गटासाठी प्रथम बक्षीस तीन हजार रुपये रोख प्रशस्तीपत्रक आणि सन्मान चिन्ह,द्वितीय बक्षी दोन हजार रुपये रोख प्रशस्तीपत्रक आणि सन्मान चिन्ह, तृतीय बक्षीस 1000 रुपये रोख प्रशस्तीपत्रक आणि सन्मान चिन्ह आणि उत्तेजनार्थ तीन बक्षिसे देण्यात येणार आहेत या स्पर्धेसाठी मर्यादित प्रवेश असून ऑनलाईन पद्धतीनेच फॉर्म भरायचा आहे स्पर्धेसाठी नाममात्र शंभर रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे प्रत्येक स्पर्धकाने प्रवेश फार्मवर आपली चार गाणी नमूद करायची असून त्यामध्ये भावगीत भक्तीगीत अभंगा आणि नाट्य गीत यांचा समावेश करता येईल मात्र चित्रपट गीताचा समावेश करता येणार नाही गाणे गाण्यासाठी तीन ते पाच मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी द्रविड ऑफिस 596 गुरुवार पेठ कमानी हौदाजवळ सातारा येथे संपर्क साधावा या स्पर्धेत भाग घेण्यासाठी अंतिम दिनांक 10 ऑगस्ट 2024 ही आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!