विभागीय जलतरण स्पर्धेत नेत्रदीपक यश
कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचा गौरव
सातारा.
शिवाजी विद्यापीठअंतर्गत सातारा विभागीय जलतरण स्पर्धा डॉल्फिन स्विमिंग पूल, कोंडवा, सातारा या ठिकाणी पार पडल्या. या स्पर्धेमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च स्टडी मधील बी.सी.ए. भाग चा विद्यार्थी पारस प्रमोद संकपाळ याने 50 मीटर व 100 मीटर बॅकस्ट्रोक क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक प्राप्त केला तसेच एम.बी.ए. भाग 2 मधील विद्यार्थी विराज वैभव तावसकर याने 200 मीटर फ्रीस्टाईल क्रीडा प्रकारात तृतीय क्रमांक प्राप्त केला. या दोघांची श्री. शहाजी छत्रपती महाविद्यालय, दसरा चौक, कोल्हापूर या ठिकाणी होणार्या अंतर-विभागीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
त्यांना इन्स्टिट्यूटचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. आक्रम मुजावर यांचे मार्गदर्शन लाभले. तर इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर डॉ. बापूसाहेब सावंत, प्रोफेसर सारंग भोला, प्रोफेसर डॉ. कुंभार, डॉ. निकम, डॉ. चव्हाण इतर सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक यांचे प्रोत्साहन मिळाले.
रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. चंद्रकांत दळवी आणि संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

