ब्राह्मण महासंघातर्फे नगराध्यक्षांचा सत्कार
सातारा
सातारचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष अमोल मोहिते यांचा ब्राह्मण महासंघातर्फे संघाचे अध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक करताना राजदीप माजगावकर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून सक्रिय व भरीव मदत मिळत असल्याबद्दल आभार मानले. संघास कायम मदत करणारेअक्षय जाधव यांच्या श्रीकांत वेलणकर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला नगरसेविका सौ प्राची शहाणे यांचा या कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात आला
अमोल मोहिते यांनी ब्राह्मण महासंघाला यापुढेही सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले
कार्यक्रमास नगरसेविका सौ माया वाघमोडे विश्वतेज बालगुडे राजू गोरे इत्यादी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी भास्कर मेहेंदळे आयडीबीआय चे वरिष्ठ निवृत्त अधिकारी शशिकांत पंडित, प्रशांत आठवले व जयदीप ठसे व इतर पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले

