नगर वाचनालयात महिला दिन साजरा


कर्तबगार महिलांचा सत्कार व ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन
सातारा
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालय सातारा येथे महिला दिनानिमित्त कर्तबगार महिलांचा सत्कार व ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन असा कार्यक्रम झाला
प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या प्राचार्य प्रमोदिनी मंडपे प्रसिद्ध कवयित्री शिल्पा चिटणीस यांचे हस्ते स्त्री आत्मकथन विषयक ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले याच ग्रंथप्रदर्शनात अभिवादन म्हणून दिवंगत लेखिका मीना प्रभू यांचे प्रवासवर्णनपर पुस्तकांचे प्रदर्शनही आयोजित केले आहे
यावेळी वृद्धाश्रमातील समर्पित कार्याबद्दल सौ अंजली कुलकर्णी ,महिला मंडळ या जुन्या संस्थेच्या कार्याबद्दल नयना क्षीरसागर ,ग्रंथ चळवळीतील योगदानाबद्दल नंदा जाधव ,दिल्ली येथील साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून निवड झाल्याबद्दल डॉक्टर आदिती काळमेख ,गिर्यारोहणातील साहसाबद्दल कुमारी धैर्या कुलकर्णी ,सामान्य परिस्थितीतून संघर्ष करणाऱ्या नगीना बागवान ,कोरोना काळात व महापूरपरिस्थितीत लेक लाडकी अभियानातून कार्य केलेल्या सिंधू कांबळे संस्कार व स्रोत्र पठण उपक्रम कार्याबद्दल शोभना नातू या महिलांचा या निमित्ताने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान केला गेला .
यावेळी अंजलीताई कुलकर्णी ,नंदा जाधव ,नयना क्षीरसागर ,धैर्या कुलकर्णी यांनी सत्काराला उत्तर म्हणून आपले मनोगत व्यक्त करताना नगर वाचनालयाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना लेखक डॉक्टर राजेंद्र माने म्हणाले स्त्रियांनी स्त्रियांना सन्मान देणेही शिकले पाहिजे .स्त्रियांच्या एक वेगळा समर्पितभाव असतो त्याचबरोबर सहनशीलता ही स्त्रियांच्यात असते .स्त्री आणि पुरुष यांच्यात समजूतीचा पूल असणे गरजेचे आहे .स्त्री पुढील पिढीला संस्कार देते श्रद्धा शिकवते पण ते सजग असणेही गरजेचे आहे .स्त्रीमुक्ती म्हणजे चौकट भिरकावणे नाही तर ती सजग बनवणे आहे .लोकसाहित्यातून स्त्रीची ही सजगता जाणवून येते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता प्रभुणे यांनी केले .कार्यक्रमाचे आभार कवी प्रदीप कांबळे यांनी मानले .
यावेळी नगर वाचनाचे अध्यक्ष अजित कुबेर आणि अनंत जोशी यांचे हस्ते प्रमोदिनी मंडपे आणि शिल्पाताई चिटणीस यांचा पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला त्याचबरोबर नगर वाचनालयाचा स्त्रीकर्मचारी रूपा मुळे , भाग्यश्री शिंदे , अन्वेषा कलेढोणकर यांचा व संचालक बानुबी बागवान यांचाही महिला दिनानिमित्त सत्कार करण्यात आला .
यावेळी डॉ. श्याम बडवे ,विजयराव पंडित ,प्राध्यापक श्रीधर साळुंखे ,गौतम भोसले आनंद ननावरे संजीव बोंडे , विष्णू धावडे , वेदान्त कारवे , विजय दळवी वगैरे मान्यवर उपस्थित होते

Advertisement

फोटो ओळ
सत्कारप्रसंगी डॉ राजेंद्र माने , अजित कुबेर अनंत जोशी महिला सत्कारमूर्ती अंजली कुलकर्णी नंदा जाधव
धैर्या कुलकर्णी नगीना बागवान सिंधू कांबळे नयना क्षीरसागर व इतर मान्यवर


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!