उपमुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर भरकटलं
फडणवीस,अजितदादा बचावले
नागपूर
राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यासोबत उद्योगमंत्री उदय सामंत आणि पार्थ पवार सुद्धा सोबत होते.खराब हवामानामुळे दृष्यमानता अत्यंत कमी झाली होती. पण हेलिकॉप्टर पायलटने मोठ्या कौशल्याने हेलिकॉप्टर सावरले आणि सुरक्षितपणे उतरवले . उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री उदय सामंत हे गडचिरोलीच्या दौऱ्यावर आहेत. सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड या गडचिरोलीतील सर्वात मोठ्या स्टील प्लांटचे भूमिपूजन सोहळा अजित पवार, देवेंद्र फडणवीस, उदय सामंत यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाला नागपूरहून हेलिकॉप्टरने येत असताना अचानक हेलिकॉप्टर हे ढगात भरकटलं होतं, अशी माहिती खुद्द अजित पवार यांनी दिली.
‘गडचिरोलीतील प्रकल्प भूमिपूजनासाठी येत नागपुरातून निघालो असताना वातावरण चांगल होतं. नंतर वातावरण खराब दिसलं चारही बाजूला ढगच ढग होते मी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बघितलं. ते गप्पा मारण्यात व्यस्त होते. चारही बाजूकडे ढग दिसत असल्याने मी काळजी व्यक्त केली. मात्र देवेंद्र फडणवीस निश्चित बसलेले होते. त्यावर फडणवीस यांनी उत्तर देताना मी सहा वेळा अपघातातून वाचलो आहे, आपण सुखरूप जाऊ, काळजी करू नका, असं गंमतीनं म्हटलं, असा किस्सा अजितदादांनी सभेत सांगितला.
