पाऊसगीतांमध्ये रसिक चिंब
हार्मनी प्रस्तुत घन निळा बरसला कार्यक्रमाला प्रतिसाद
सातारा
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या पुढाकाराने हार्मनी या संस्थेने प्रस्तुत केलेल्या घन निळा बरसला या संगीत कार्यक्रमाला रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला हार्मनीच्या कलाकारांनी यावेळी सादर केलेल्या पाऊसगीतांमध्ये रसिक चिंब भिजून गेले
दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून शिरीष चिटणीस,डॉ सुनील पटवर्धन,डॉ मंजुश्री पटवर्धन,नायब तहसीलदार सुनील शेटे उपस्थित होते या सर्व मान्यवरांनी दीपप्रज्वलन केल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली




हार्मनीचे रवींद्र खांडेकर,धनंजय जाधव,धनश्री बागडे आणि श्वेता जाधव यांनी यावेळी जुन्या आणि नवीन काळातील हिंदी मराठी गाणी सादर केली
धनश्री बागडे यांनी प्रारंभी गणेश वंदना म्हणली आणि घन निळा बरसला हे गीत सादर केले या सर्व कलाकारांनी यावेळी डम डम डिगा, हाय हाय ये मजबुरी,ये रात भिगी भिगी,वल्हव रे नाखवा, कुछ केहता है सावन,निशाणा तुला कळला ना,परबत से काली घटा,हाय रे हाय ,आला आला वारा,पतझड सावन वसंत बहार,सावन का महिना आया है,आपकी नजरोने समजा,दिल तो पागल है,झुमता मोसम मस्त हसीना,टीप टीप बरसा पाणी अशी अनेक गाणी सादर करून रसिकांची वाहवा मिळवली
श्वेता जाधव आणि धनंजय जाधव यांनी सादर केलेल्या हाय ए हाय या गाण्याला रसिकांनी वन्स मोर अशी दाद दिली
यावेळी बोलताना डॉ सुनील पटवर्धन यांनी दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक केले शिरीष चिटणीस यांच्यामुळे गायक कलाकाराना व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचे त्यांनी नमुद केले
शिरीष चिटणीस यांनी आपल्या मनोगतात अशा कार्यक्रमाचे महत्व विशद केले सातारा शहरात सातत्याने असे कार्यक्रम करून सातारला एक सांस्कृतिक शहर म्हणून दर्जा पुन्हा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले अशा कार्यक्रमांसाठी दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल सदैव उपलब्ध असेल असे त्यांनी आवर्जून सांगितले
