डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार
स्नायपरनं हल्लेखोर शूटरला ठार मारलं
वॉशिंग्टन
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्रचार रॅलीत गोळीबार झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. शनिवारी सकाळी झालेल्या या घटनेत एका शूटरन रॅली सुरू असलेल्या परिसरातील उंच इमारतीवरून हा हल्ला केला.यात ट्रम्प यांच्या कानाला एक गोळी चाटून केली आहे. यानंतर ट्रम्प यांच्या कानाजवळून रक्त वाहत होतं. सुरक्षा रक्षकांना हल्लेखोर शूटर दिसताच डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या एका स्नायपरनं लांब अंतरावर असणाऱ्या हल्लेखोराला ठार मारलं.

शनिवारी संध्याकाळी ६.२ मिनिटांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पेनसिल्व्हेनियाच्या बटलरमधील एका मैदानात रॅलीला संबोधित करत असतांना त्याच्यावर एका लांब आणि उंच इमारतीवर बसलेल्या एका शार्प शूटरने गोळीबार केला. मात्र, पुढच्याच सेकंदात डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या स्नायपरने शूटरला ठार केले.अमेरिकेत बेकायदेशीरित्या आलेल्या परदेशी नागरिकांबद्दल अध्यक्ष जो बायडेन यांच्या धोरणांवर टीका करत असतांना डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पाच गोळ्या झाडण्यात आल्या. यातील एक गोळी ही डोनाल्ड ट्रम्प यांच्या कानाला चाटून गेली. यावेळी सीक्रेट सर्व्हिस एजंट्स त्यांच्या दिशेने धाव थेट त्यांना सुरक्षित केले. तर याच वेळी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या स्नायपरने शूटरला ठार मारले. डोनाल्ड ट्रम्पवर गोळी झाडणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली असून थॉमस मॅथ्यू (वय २०) असे त्याचे नाव आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांना त्याला का मारायचे होते हा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही.
डोनाल्ड ट्रम्प खाली वाकताच सुरक्षा एजंट्सनी ट्रम्प यांना घेरले. ट्रम्प यांच्या कानातून रक्तस्त्राव होत असल्याने त्यांनी त्यांना स्टेजच्या डाव्या बाजूला नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी डोनाल्ड ट्रम्प “थांबा, थांबा, थांबा म्हणाले. त्यानंतर त्यांनी गर्दीच्या दिशेने हवेत मुठ उंचावली आणि “लढा” म्हणत जनतेला आवाहन केले. त्यानंतर एजंटांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पायऱ्यांवरून खाली उतरवून एका काळ्या एसयूव्हीमध्ये बसवले.
हल्लेखोर मॅथ्यू हा एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर बसून होता. त्याने तिथून ट्रम्प यांच्या दिशेने गोळ्या झाडल्या. सुदैवाने ट्रम्प यांच्या कानाला गोळी चाटून गेली.
