महाराणी येसूबाईंचे स्मारक शृंगारपूर येथे उभारा


विधान परिषदेत आमदार प्रवीण दटके यांची मागणी
मुंबई
राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांच्या नात सून ,श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुनबाई व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी सखी राज्ञी जयती येसूबाई साहेब ” यांच्या जीवन कार्याची दखल घेत त्यांचे माहेर असलेल्या शृंगारपूर या ठिकाणी त्यांचे भव्य असे स्मारक उभे करावे अशी मागणी आमदार श्री प्रवीण दटके यांनी विधान परिषदेत केली
शृंगारपूर या ठिकाणी असे स्मारक उभे राहिल्यामुळे इतिहास प्रसिद्ध असे छत्रपती घराणे व राजेशिर्के घराण्याचा यथोचित सन्मान होईल अशी मागणी करणारा प्रश्न आमदार श्री प्रवीण दटके विधान परिषदेत अध्यक्ष नीलम ताई गोरे यांच्यासमोर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री सुधीर मनगुंटीवार साहेब यांच्या सहकार्याने उपस्थित केला.
याबद्दल या विषयाचा पाठपुरावा करणारे श्री सुहास राजेशिर्के यांनी सर्व संबंधितांचे आभार मानले आहेत आणि हा प्रश्न लवकरात लवकर तडीस नेला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!