होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद


इस्त्रायलकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्याने इराणचा संताप

वॉशिंग्टन
अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध शस्त्रसंधी झाल्यानं आखाती देशातील संघर्ष थांबल्याचं चित्र निर्माण झालं होतं.मात्र, इस्त्रायलकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आल्यानं इराणकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळं जगभरातील ऊर्जासाधनांच्या पुरवठ्यावर परिणाम होऊन पुन्हा तणाव वाढण्याची शक्यता आहे.
इस्त्रायलकडून लेबनॉनमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. यामुळं इराणच्या नौदलानं होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. होर्मुझची सामुद्रधुनी परवानगीशिवाय पार करु नये अशी धमकी देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
इराणकडून या सर्व घटनाक्रमानंतर जहाजमालकांना इशारा देण्यात आलाय, परवानगीशिवाय जहाज होर्मुझमधून पार करण्याचा प्रयत्न करु नये. परवानगीशिवाय होर्मुझची सामुद्रधुनी पार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जहाजांवर हल्ले करुन ती जहाजं नष्ट केली जातील. अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी झाल्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण आहे.
सागरी नियंत्रण संस्थेनं मरीन ट्रॅफिकच्या हवाल्यानं इराण आणि अमेरिका यांच्यातील सशर्त शस्त्रसंधी झाल्यानंतर केवळ दोन जहाजे होर्मुझची सामुद्रधुनी पार करु शकली आहेत. यामुळ होर्मुझच्या सामुद्रधुनी पार करण्यासाठी थांबलेल्या जहाजांची चिंता वाढली आहे.

Advertisement

अमेरिकेनं पूर्ण ताकद लावून देखील 40 दिवसांनंतर होर्मुझच्या सामुद्रधुनी खुली करण्यासाठी इराणला झुकवू शकला नाही. मात्र, अमेरिकेला शस्त्रसंधी करावी लागली. डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणं प्राथमिकता असल्याचं म्हटलं. डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनी केवळ 2 मिनिटांमध्ये खुली करु असे दावे केले होते. शस्त्रसंधी जाहीर झाल्यानंतर परिस्थिती वेगळी पाहायला मिळत आहे. इराणनं त्यांच्या अटीवर होर्मुझची सामुद्रधुनी उघडली होती. आता पुन्हा सामुद्रधुनी बंद करण्यात आली आहे.

इराणनं होर्मुझमधून पार होणाऱ्या जहाजांवर टोल आकारणार असल्याचं म्हटलं होतं. इराणचं सैन्य पूर्ण मार्गावर नियंत्रण ठेवेल. जगातील ऊर्जा साधनांची 20 टक्के वाहतूक होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होते. इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षित करण्यासाठी चार स्तरीय यंत्रणा तयार केलं आहे. यामध्ये क्षेपणास्त्र, युद्धनौका आणि ड्रोनचा समावेश आहे.

दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला जे देश शस्त्र पुरवठा करतील त्या देशांवर 50 टक्के निर्यात शुल्क लादण्याची धमकी दिली आहे. आता अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षात पुढं काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!