रोहितचे आईकडून कौतुक


डॉक्टरांची अपॉईंटमेंट सोडून मुलाच्या भेटीसाठी आल्या
मुंबई
मुंबईचा लाडका, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 29 जून रोजी बार्बाडोसमध्ये अंतिम सामना जिंकू टी20 वर्ल्ड कप वर नाव कोरलं. टीम इंडियाचा विजय झाल्यापासूनच संपूर्ण देश त्यांची वाट पहात होता.4 जुलैला भारतीय संघ मायदेशी परतला तेव्हा प्रथम दिल्लीत आणि नंतर मुंबईत लाखो चाहत्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. रोहित शर्मा आपल्या संघासह विश्वविजेता बनण्यासाठी एका महिन्याहून अधिक काळ देशाबाहेर राहिला होता. इतके दिवस तो आई बाबांपासून दूर राहिला. त्यामुळ वर्ल्डकप जिंकून जेव्हा तो मुंबईत आला, तेव्हा त्याच्या आईने अनेक दिवसांनी त्याला पाहिले. रोहितला पाहण्यासाठी, त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. तेव्हाच त्याच्या आईने आपल्या लाडक्या लेकाना मिठा मारत, गालावर, कपाळावर किस केलं. यावेळी त्याचे वडीलही उपस्थित होते.
प्रत्येक भारतीयाप्रमाणे 4 जुलै हा दिवस रोहित शर्माच्या पालकांसाठी अभिमानाने भरलेला होता. अखेर त्यांचा मुलगा वर्ल्ड चॅम्पियन बनून परतला आणि संपूर्ण देश त्याला सलाम करत होता. या दोघांनीही अनेक दिवस आपल्या मुलाला पाहिले नव्हते. त्यामुळे तेही मुलाच्या आनंदात सहभागी होण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर पोहोचले. रोहितची आई पूर्णिमा शर्मा यांची तब्येत ठीक नाही आणि डॉक्टरांची अपॉईंटमेंट ठरली होती. पण त्यांना आपल्या मुलाचा खास क्षण, त्याचं होणारं कौतुक चुकवायचं नव्हतं. शर्मा कुटुंबीय बऱ्याच दिवसांपासून या क्षणाची वाट पाहत होते. त्यामुळे या आनंदात सामील होण्यासाठी पूर्णिमा शर्मा या स्टेडियमवर आल्या होत्या. वर्ल्डकपला जाण्यापूर्वी असा दिवस बघायला मिळेल असा विचारही केला नव्हता, असे रोहितच्या आईने सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!