विराट आणि रोहितचा अलविदा
टी- २० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर
नवी दिल्ली
हिटमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने आणि विक्रमवीर विराट कोहली या दोघांनीही T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला नमवून भारताने विश्वचषकावर आपले नाव कोरले.त्यानंतर रोहितने ही घोषणा केली. T20 मधून निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ असल्याचेही तो म्हणाला. रोहितने घोषणा करण्यापूर्वीच अंतिम सामन्यात ७६ धावांची झंझावाती खेळी करणाऱ्या विराट कोहलीने देखील टी- २० मधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ताज्या दमाच्या खेळाडूंनी आमची जागा घेण्याची हीच वेळ आहे असे विराट म्हणाला
विश्वचषक जिंकल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्माने ही घोषणा केली. हा माझा शेवटचा सामना होता. निवृतीची यापेक्षा दुसरी कोणतीच योग्य वेळ असू शकत नाही. कोणत्याही परिस्थितीत मला हा विश्वचषक जिंकायचाच होता. माझी हीच इच्छा होती आणि आम्ही हे करून दाखवले. विश्वचषक जिंकल्यानंतरचा आनंद, माझ्या भावना शब्दात मांडणे कठीण आहे, असेही रोहित यावेळी म्हणाला.
