संगीत कार्यक्रमांमुळे गायकांच्या स्मृती चिरंतन राहतात


दीपलक्ष्मी सभागृहातील कार्यक्रमात मुकुंद फडके यांचे प्रतिपादन

सातारा
कराओकेच्या माध्यमातून किंवा लाईव्ह पद्धतीने संगीत विषय कार्यक्रम सातत्याने होत असतात.अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे संगीतसृष्टीतील गायकांची गाणी आणि त्यांची ओळख चिरंतन राहते असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि चित्रपट अभ्यासक मुकुंद फडके यांनी केले.
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि संगीत प्रेमीग्रुपतर्फे दीपलक्ष्मी सभागृहामध्ये गाण्यांची सुरेख मैफिल हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तेव्हा प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी इतर प्रमुख पाहुणे म्हणून काका पाटील, डॉक्टर कामिनी पाटील, मनोज तपासे, राजेंद्र हेंद्रे, शिरीष चिटणीस उपस्थित होते.
मुकुंद फडके म्हणाले, आशा भोसले आणि सुमन कल्याणपुर या ज्येष्ठ गायिकांचे नुकतेच निधन झाले. पण त्यांची गाणी अजूनही संगीत विषय कार्यक्रमांमध्ये गायली जात असल्याने त्यांच्या स्मृती चिरंतन राहणार आहेत. लता मंगेशकर, मोहम्मद रफी, मुकेश, किशोर कुमार, महेंद्र कपूर, हेमंत कुमार,मन्ना डे अशा अनेक गायकांनी जे मोठे काम करून ठेवले आहे ते जपण्याचे आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम संगीत विषयक कार्यक्रम करत असतात
मुकुंद फडके यांनी यावेळी आशा भोसले, सुमन कल्याणपूर, मोहम्मद रफी, लता मंगेशकर यांच्या जीवनातील काही आठवणींचा आढावा घेतला.
काका पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये अशा कार्यक्रमांचे महत्त्व विशद केले. दीपलक्ष्मी सभागृहाच्या माध्यमातून संगीत विषयक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून शिरीष चिटणीस मोठे काम करत आहेत असे ते म्हणाले
शिरीष चिटणीस यांनी आपल्या भाषणामध्ये साताऱ्यातील सांस्कृतिक कार्यक्रमांचे व्यासपीठ म्हणून हे सभागृह कायमस्वरूपी उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले.
या कार्यक्रमाचे आयोजक प्रमोद लोंढे, राजेंद्र पाटील व विनयकुमार होते या संगीत कार्यक्रमात तरनुम सय्यद,सुजाता नावंधर,सुधा पटवर्धन,अस्मिता होके,प्रदीप पवार,विलास चव्हाण, माणिक कांबळे,संजय खराटे, किशोर होके,सलीम चाचा, संदेश जावळे, कदीर सय्यद,डॉक्टर बारटक्के, शरीफ सलाती यांनी विविध गाणी सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळवली.शिरीष चिटणीस आणि कामिनी पाटील यांनी सादर केलेल्या गाण्यानाही दाद मिळाली.

Advertisement

फोटो ओळ
दीपप्रज्वलन करताना डॉ कामिनी पाटील,शेजारी प्रमोद लोंढे,राजेंद्र हेंद्रे,मनोज तपासे,काका पाटील,मुकुंद फडके ,शिरीष चिटणीस,विनय कुलकर्णी,राजेंद्र पाटील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!