विशाल पाटील अपक्ष लढणार


वसंतदादा आघाडी नावाने नवीन आघाडी स्थापन करणार

Advertisement

सांगली :
लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीसाठी सांगलीची जागा वादाचा विषय ठरली.जागावाटप जाहीर झाल्यानंतर काही काळ नॉट रिचेबल असलेल्या विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारीचा पर्याय निवडला आहे. त्यामुळे सांगलीत हा काँग्रेससाठी मोठा धक्का आहे.विशाल पाटील यांच्या स्वीय सहायकाने त्यांच्यासाठी उमेदवारी अर्ज घेतला आहे. त्यामुळे आता काँग्रेसकडे वारंवार उमेदवारी मागणारे विशाल पाटील यांनी सांगलीमध्ये अखेर काँग्रेसविरोधात बंडखोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे. विशाल पाटील हे अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करून ठेवणार आहेत. असे असले तरी देखील काँग्रेसकडून तिकीट मागण्यावर देखील ते अद्याप ठाम आहेत.तसेच, वसंतदादा आघाडी नावाने विशाल पाटील हे आघाडी देखील स्थापन करणार असून त्यांच्या नावाने देखील स्वतंत्र उमेदवारी अर्ज भरण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.
विशाल पाटील हे आज अर्ज दाखल करणार होते. परंतु तांत्रिक कारणामुळे ते सोमवारी अर्ज दाखल करणार आहेत. सांगलीची जागा ही ठाकरे गटाकडे गेल्यानंतर काँग्रेस पदाधिकारी हे प्रचंड नाराज आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये ही निवडणूक लढायची असा निर्धारच काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
विशाल पाटील यांना काँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते पुन्हा आक्रमक झाले आहेत. त्यामुळे सांगली काँग्रेसमध्ये पहिली वादाची ठिणगी पडली आहे. मिरज तालुका काँग्रेस कमिटी आजपासून बरखास्त करण्याचा ठराव काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. सांगलीमधील विशाल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडलेल्या मिरज तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सर्व तालुक्यात पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आक्रमक भूमिका काँग्रेस पदाधिकारी घेण्याची चिन्हे आहेत.सांगलीमध्ये आज काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची तालुका न्याय बैठक आज पार पडली आहे. या बैठकीमध्ये लढण्याची भूमिका विशाल पाटील यांनी घ्यावी, अशी आग्रहाची मागणी काँग्रेस कार्यकर्ते करत आहेत. येत्या काही दिवसांमध्ये काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांचा दौरा आहे. या दौऱ्यावर काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी बहिष्कार घालावा. कारण, त्यांनी उमेदवारी मागण्यासाठी आग्रही भूमिका घेतली नाही, असा आरोप काँग्रेस पदाधिकारी करत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!