चहापानासाठी सारे एकत्र


विधिमंडळाचे अधिवेशन गुरुवारपासून

Advertisement

मुंबई
विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्र आले.विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला गुरूवारपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह इथं चहापान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, गृहनिर्माण व इतर मागास बहूजन कल्याण मंत्री अतुल सावे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री मंगलप्रभात लोढा , ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन , कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्रिमंडळातील सदस्य आणि विधिमंडळातील सदस्य, वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर अजितदादा हे फारसे बैठकांना हजर नव्हते. एवढंच नाहीतर दिल्लीत झालेल्या बैठकीलाही गेले नव्हते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!