सुहास कुलकर्णी यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ


मंगळवारी सायंकाळी विशेष कार्यक्रम

Advertisement

सातारा
सातारा एज्युकेशन सोसायटीच्या एन बी देशमुख कनिष्ठ महाविद्यालयातील विभाग प्रमुख सुहास दत्तात्रय कुलकर्णी यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ मंगळवार दिनांक 30 एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माण खटाव शुगर फॅक्टरीचे चेअरमन प्रभाकर घार्गे उपस्थित राहणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातारा एज्युकेशन सोसायटीच्या चेअरमन डॉक्टर चेतना माजगावकर असणार आहेत या कार्यक्रमाला सातारा एज्युकेशन सोसायटीचे संचालक सुनील झंवर डॉक्टर धनंजय बोधे अजित साळुंखे मधुकर फडतरे यांची उपस्थिती राहणार आहे अनंत इंग्लिश स्कुल येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला सर्वानी उपस्थित राहावे असे आवाहन प्राचार्य श्रीमंत गायकवाड यांनी केले आहे
सुहास कुलकर्णी यांनी एन बी देशमुख ज्युनिअर कॉलेजमध्ये विभाग प्रमुख म्हणून 31 वर्ष काम पाहिले असून सध्या ते सातारा एज्युकेशन सोसायटीच्या गव्हर्मेंट बॉडीवर संचालक म्हणून काम करत आहेत अनंत इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन कोर्स,मॅथेमॅटिक्स लॅब,कटगुण येथे मिनी आयटीआय असे अनेक उपक्रम त्यांनी यशस्वी करून दाखवले आहेत


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!