नेटफ्लिक्स लवकरच मोफत


सतत जाहिराती पाहाव्या लागणार

वॉशिंग्टन

Advertisement

अनेकजणांना नेटफ्लिक्सवरील वेब सीरिज अथवा इतर शो फार आवडतात. पण दरमहा महागड्या प्लॅनमुळे अनेक जण या इच्छेला मुरड घालतात. अशा युझर्सला खेचून आणण्यासाठी आता नेटफ्लिक्सने एक जोरदार उपाय केला आहे.नेटफ्लिक्सवर लवकरच ग्राहकांना मोफत कंटेंटचा आनंद लुटता येईल. युट्यूबप्रमाणे मोफत सेवा देण्यासाठी नेटफ्लिक्सवर जाहिरातींचा भडिमार असेल. कंटेंट पाहताना या जाहिराती रसभंग करतील.
ब्लूमबर्गच्या एका बातमीनुसार, कंपनी युरोप आणि आशियातील युझर्ससाठी अशी भन्नाट योजना आणण्याच्या विचारात आहे. अर्थात ही योजना कशी असेल, याविषयी कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही. जर नेटफ्लिक्सने भारतात ही योजना आणली तर युझर्सला त्यांचे आवडते शोज आणि चित्रपट पाहण्यासाठी पैसे खर्च करण्याची गरज पडणार नाही. तुम्ही पण कंटेंट पाहु शकाल, पण जाहिरातीसह.ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, नेटफ्लिक्सने या प्रयोगाची चाचणी आफ्रिकन देश केनियात केली आहे. पण ही सेवा तात्काळ मागे पण घेण्यात आली. आता युरोपसह आशियात हा प्लॅन आणण्याच्या तयारीवर प्राथमिक बोलणी सुरु आहे.
सध्या भारतात नेटफ्लिक्सचा सर्वात स्वस्त मोबाईल प्लॅनची किंमत 149 रुपये आहे. नेटफ्लिक्सचे प्रिमियम मंथली सब्सक्रिप्शनची किंमत 649 रुपयांपर्यंत आहे. भविष्यात जर नेटफ्लिक्स जाहिरातींच्या आधारे मोफत योजना घेऊन आले तर युझर्सचा मोठा फायदा होईल. तर बाजारात तीव्र स्पर्धा पण असेल.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!