साताऱ्यामध्ये आज ललित लेखांचे अभिवाचन
डॉ निर्मोही फडके यांच्या संकल्पनेतून अनहद कार्यक्रम
सातारा
आम्ही पुस्तकप्रेमी समूह आणि दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सातारा यांचे संयुक्त विद्यमाने दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या सभागृहात शुक्रवार दिनांक 9 मे 2025 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता ठाणे येथील सुप्रसिद्ध लेखिका डॉक्टर निर्मोही फडके यांनी लिहिलेल्या ललित लेखांच्या अभिवाचनाचा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाची संकल्पना आहे निरंतर चालणारा चक्रध्वनी अनहद तिचा, त्याचा,सर्वांचा. या अभिवाचनाचे संकलन आणि दिग्दर्शन योगेश केळकर यांचे असून स्वतः योगेश केळकर आणि वंदना गुजरे हे अभिवाचन करणार आहेत. या कार्यक्रमास कूपर उद्योग समूहाचे महाव्यवस्थापक नितीन देशपांडे तसेच दैनिक प्रभातचे निवासी संपादक आणि जेष्ठ पत्रकार श्रीकांत कात्रे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाचा सातारकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन आम्ही पुस्तक प्रेमी समूहाचे प्रमुख डॉक्टर संदीप श्रोत्री,अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी,दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शिरीष चिटणीस आणि आम्ही पुस्तक प्रेमी समूहाचे समन्वयक श्रीराम नानल यांनी केले आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड सीमंतीनी नूलकर या करणार आहेत.

