श्वानावर हार्ट सर्जरी


भारतातील पहिलीच घटना

Advertisement

नवी दिल्ली
दिल्लीतील ईस्ट ऑफ कैलाशमध्ये सिस्टम मॅक्स पेट्स केअर रुग्णालय हे प्राण्यांच्या उपचारासाठी असलेले प्रथम क्रमांकाचे रुग्णालय आहे. याठिकाणी एका डॉक्टरने एका श्वानावर हार्ट सर्जरी केली विशेष म्हणजे अशा प्रकारची शस्त्रक्रियाही भारतात कोणत्याच रुग्णालयात झालेला नाही. त्यामुळे येथील डॉक्टरने प्राण्यांच्या वैद्यकीय क्षेत्रात एक प्रकारे चमत्कार करुन दाखवला आहे, असे म्हटले जात आहे.
ही शस्त्रक्रिया कार्डियोलॉजिस्ट डॉ. भानु देव शर्मा यांनी केली. ते या क्षेत्रात 16 वर्षांपासून प्राण्यांवर उपचार करत आहेत.त्यांना या हार्ट सर्जरीबाबत विचारण्यात आले बीगल जूलियट नावाचा श्वान मागील दोन वर्षांपासून मायट्रल वॉल्व्हच्या आजाराने ग्रस्त होता.प्राण्यांमध्ये अशा प्रकारची स्थिती तेव्हा निर्माण होते जेव्हा मायट्रल वॉल्व्ह लीफलेट्समध्ये आतून बदल होतो. या कारणामुळे हृदयाच्या डाव्या बाजूला ब्लॉकेज होऊ लागतात. मात्र, या सर्जरीनंतर हार्टच्या आत ब्लड सर्कुलेशन पुन्हा ठीक होते. पण जर या आजाराचा वेळेच्या आत उपचार झाला नाही तर हार्ट फेल होण्याची शक्यता असते. यामुळे श्वानाचा मृत्यूही होतो. या प्रकारचा आजार हा स्मॉल ब्रीडवाल्या श्वानांमध्ये पाहायला मिळतो
डॉक्टर भानु देव यांनी सांगितले की, या प्रकारचा आजार झाल्यावर फक्त मेडिसिन आणि डायलिसिसचा आधार घेतला जात होता. मात्र, काही वर्षांपूर्वी चीनच्या शांघाईमध्ये एक ट्रेनिंग सेंटरमध्ये या सर्जरीच्या बाबत पहिल्यांदा रिसर्च करण्यात आले होते. यामध्ये डॉक्टरही सहभागी होते. यानंतर सर्वात पहिल्यांदा अमेरिकेतील कोलोराडो स्टेट यूनिव्हर्सिटीमध्ये ही शस्त्रक्रिया 2 वर्षांपूर्वी करण्यात आली. आता भारतात पहिल्यांदाच ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यात आली आहे. तसेच जर खासगी रुग्णालयांचा विचार केला असता ही आशियातील पहिलीच शस्त्रक्रिया आहे. आर्थिकदृष्ट्या विचार केला असता ही शस्त्रक्रिया करण्यासाठी 8 ते 10 लाख रुपये खर्च येतो
श्वानाच्या आत एका वॉल्व्हचा उपयोग करुन ट्रान्सकॅथेटर एज-टू-एज रिपेअर (टीईईआर) प्रक्रिया केली. याला हायब्रिड सर्जरीही म्हटले जाते. हे एक मायक्रो सर्जरी आणि इंटरवेन्शनल प्रकियेचा संयोग आहे. या प्रक्रियेबाबत सर्वात चांगली बाब ही आहे की, ती कमीत कमी आक्रमक असते. कारण ती हृदयावर केली जाते. ही शस्त्रक्रिया ओपन हार्ट सर्जरीसारखी नाही, असेही त्यांनी सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!