चिनाब पुलावर रेल्वेची यशस्वी ट्रायल
भारतीयांची स्वप्नपूर्ती, रेल्वे मंत्र्यांनी शेअर केला व्हिडिओ
नवी दिल्ली
कोट्यवधी देशवासीयांचं स्वप्न आता साकार होणार आहे. जगातील सर्वात उंच ब्रिज अशी ओळख असलेला चिनाब रेल्वे ब्रिज आता काहीच दिवसांत सुरु होणार आहे. यासाठी या ब्रिजवरुन रेल्वे इंजिनची चाचणी घेणं सुरु झाले आहे त्याचाच भाग म्हणून या मार्गावर सांगलदान-रियासी लिंकची ट्रायल रन घेतली. हा ब्रिज चिनाब नदीवर तब्बल 359 मीटर उंचीवर उभारण्यात आलाय. तर या ब्रिजची मुख्य कमान 467 मीटर इतकी आहे.
पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षा 35 मीटरहून जास्त याची उंची आहे. अतिवेगवान वारे, तसंच भूकंपरोधक अशी याची रचना आहे. आंतरराष्ट्रीय स्तराच्या वेल्डिंगचा यासाठी वापर करण्यात आलाय. या ब्रिजमुळे जम्मू काश्मीरची दळणवळण यंत्रणा आणकी भक्कम होणार आहे. पर्यटनालाही यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे. तंसच देशाच्या अर्थव्यवस्थेलाही याचा फायदा होणार आहे. तर सूरक्षा यंत्रणांसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. काश्मीर खोऱ्याला देशाशी रेल्वेनं जोडणारा हा मार्ग आहे. स्थानिकांसाठी अनेक संधी यामुळे खुल्या होणार आहेत.बनिहालदरम्यान रियासी इथं चिनाब नदीवर हा पूल उभारण्यात आला आहे.
या पुलाची उंची नदीपासून 359 मीटर आहे.हा पुल कुतुबमीनारच्याही 5 पट अधिक उंच आणि पॅरिसच्या आयफेल टॉवर पेक्षाही 35 मीटर उंच आहे.स्वातंत्र्यानंतर भारतीय रेल्वेच्या इतिहासास हा पूल विज्ञान आणि तंत्रज्ञानांचं उत्तम उदाहरण म्हणून पुढे येणार आहे. प्रोजेक्टमध्ये एकूण 38 टनल आहेत. सर्वात लांब टनल ही 12.75 किलोमीटरची आहेत. ब्रिज बनवण्यासाठी एक खास प्रकारची केबल वापरण्यात आली आहे. ज्याची क्षमता 20 आणि 37 मेट्रीक टन आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार 266 किलोमीटर प्रति तासाने जरी वारे वाहत असतील तरी हा पूल हलणार नाही.आयफेल टॉवरपेक्षा उंच आणि इंद्रधनुष्यासारखी कमान असलेला हा पूल जगातलं एक आश्वर्य ठरणार आहे.
