सुनेत्रा पवार राज्यसभेवर जाणार
राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल
मुंबई
अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेवर पाठवणार असल्याचं अखेर स्पष्ट झालं आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी राज्यसभेची निवडणूक होत आहे. त्या जागेवरून सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवणार अशी चर्चा होती.अखेर ही चर्चा खरी ठरली असून, सुनेत्रा पवार यांनी आज (13 जून 2024) राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा अखरेचा दिवस होता.
यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ उपस्थित होते.गेल्या दोन दिवसांपासून या उमेदवारीवरून अजित पवारांच्या नेतृत्वाती राष्ट्रवादीच्या गोटात मतभेद निर्माण झाल्याचं माध्यमांमधून सांगण्यात येत होतं. पण त्यावर काहीही औपचारिक माहिती येत नव्हती.त्यात रोहित पवारांनी ट्विट करत सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचं अॅडव्हान्समध्ये अभिनंदन केल्यानं चर्चेला तोंड फुटलं. अखेर या चर्चांवर आता पडदा पडला आहे.
