वांग मराठवाडी, उत्तर मांड मध्यम प्रकल्पबाधितांचे प्रश्न सोडविणार


मंत्रालयातील बैठकीत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यनाचे प्रतिपादन

मुंबई
वांग मराठवाडी आणि उत्तर मांड मध्यम प्रकल्पबाधितांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले.वांग मराठवाडी मध्यम प्रकल्प आणि उत्तर मांड मध्यम प्रकल्पामधील बाधित प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत आज मंत्रालयात मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, मुख्य अभियंता डॉ. ह. तू. धुमाळ, मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव संजय धारूरकर, पुणे विभागाच्या उपायुक्त (पुनर्वसन) पूनम मेहता, साताराचे अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, तारळीचे कार्यकारी अभियंता राहुल धनवट यांच्यासह वांग मराठवाडी आणि उत्तर मांड मध्यम प्रकल्प येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

Advertisement

मंत्री अनिल पाटील म्हणाले की, पाटण तालुक्यातील वांग मराठवाडी मध्यम प्रकल्पातंर्गत अंशत: बाधित गाव मौजे जिंती व निगडे प्रकल्पग्रस्तांच्या मागणीबाबतचा प्रस्ताव तसेच उत्तरमांड मध्यम प्रकल्पामुळे अंशत: बाधित झालेल्या माथनेवाडी येथील 46 घरांच्या पुनर्वसनाबाबतचा प्रस्ताव नव्याने सादर करण्यात यावा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!