ऑलिम्पिकआधी हमासची धमकी


‘पॅरिसच्या रस्त्यांवरुन रक्ताच्या नद्या वाहतील..

Advertisement

पॅरिस
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 26 जुलैपासून सुरू होणार असून 11 ऑगस्ट रोजी संपणार आहेत. याचदरम्यान हल्ला करण्याची धमकी हमासने दिली आहे.
हमासने धमकीचा व्हिडीओ जारी केला आहे. ऑलिम्पिकदरम्यान पॅरिसच्या रस्त्यांवरुन रक्ताच्या नद्या वाहतील, अशी धमकी हमासकडून देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने तोंडावर मास्क घातले असून त्याच्या कपड्यावर पॅलेस्टाइनचा झेंडा असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
हमास ही पॅलेस्टिनी अतिरेकी संघटना आहे, जी गाझा पट्टीवर पूर्णपणे राज्य करते. ते तेथे राहणाऱ्या लोकांमध्ये लपून त्यांची संपूर्ण फौज तयार करतात. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रं असतात, ज्याद्वारे ते प्रत्येक वेळी इस्रायलला लक्ष्य करतात. अशा हल्ल्यांसाठी इराण हमासला उघडपणे मदत करतो, असं मानलं जातं. तर ब्राझील, चीन, इजिप्त, इराण, नॉर्वे, कतार आणि रशियासह अनेक देश हमासला दहशतवादी संघटना मानत नाहीत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!