न्यूझीलंडचा पराभव
अफगाणिस्तानचा धक्कादायक विजय
न्यूयॉर्क
टी २० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानने ऐतिहासिक कामगिरी करत न्यूझीलंडचा 84 धावांनी पराभव केला. या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 159 धावा केल्या होत्या, त्यानंतर न्यूझीलंडचा संघ केवळ 75 धावा करू शकला
फजलहक फारुकी आणि राशिद खान यांनी मिळून अफगाणिस्तानसाठी इतिहास रचला. दोन्ही गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत किवी फलंदाजांचे कंबरडे मोडले. राशिद खानने 4 विकेट्स घेत आश्चर्यकारक कामगिरी केली, तर फजलहक फारुकीने 4 विकेट्स घेतल्या. याशिवाय मोहम्मद नबीने 2 बळी घेण्यात यश मिळवले. अफगाणिस्तानने पहिल्यांदाच टी-20 वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडचा पराभव केला आहे. 2022 च्या T-20 विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघांमध्ये एक सामना खेळला गेला होता जो न्यूझीलंडने जिंकला होता. मात्र यावेळी अफगाणिस्तान संघाने विश्वचषकात इतिहास रचताना न्यूझीलंड संघाचा पराभव करून मोठा अपसेट निर्माण केला आहे.
तत्पूर्वी अफगाणिस्तानसाठी रहमानउल्ला गुरबाजने करिष्माई फलंदाजी केली. रहमानउल्ला गुरबाजने 56 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 80 धावा केल्या, तर इब्राहिम झद्रानने 41 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 44 धावा केल्या. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 101 धावांची भागीदारी केली होती. T-20 World Cup दुसरीकडे, ओमरझाईने 13 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 22 धावांची खेळी करत अफगाणिस्तान संघाला 159 धावांपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्ट आणि मॅट हेन्रीने 2-2 विकेट घेतल्या. गुरबाजने एकट्याने 80 धावा केल्या तर न्यूझीलंडचा संपूर्ण संघ केवळ 75 धावा करू शकला. म्हणजे गुरबाजच्या एकहाती खेळीने किवी संघाला पराभवाच्या दारात आणले.
