अभिनेता जॉनी व्हॅक्टरची गोळ्या झाडून हत्या


वॉशिंग्टन
हॉलिवूडमधून एक वाईट बातमी समोर येत आहे. करण्यात आली आहे. त्याच्यावर लॉस एंजेलिसमध्ये चोरांनी हल्ला केला. अभिनेत्याला रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तो फक्त 37 वर्षांचा होता. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. जॉनीच्या मृत्यूच्या बातमीने कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. सर्वांनाच धक्का बसला आहे. चोरटे त्याच्या कारमधून कॅटॅलिटिक कन्व्हर्टर चोरण्याचा प्रयत्न करत होते.अभिनेत्याने चोरांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही, तरीही त्यांनी त्याला गोळ्या घातल्या.
जॉनीचा एजंट डेव्हिड शॉलने त्याच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला. ‘पीपल मॅगझिन’शी बोलताना डेव्हिडने जॉनीची आठवण ‘अद्भुत व्यक्ती’ म्हणून केली. तो खूप प्रतिभावान होता.त्याच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे.
जॉनी ‘जनरल हॉस्पिटल’मधील ब्रँडो कॉर्बिनच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. 200 हून अधिक भाग असलेल्या या शोमध्ये जॉनीने ड्रग ॲडिक्ट साशाच्या पतीची भूमिका साकारली होती.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!