महिला पोलीस अधिकाऱ्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
पुण्यात फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशनच्या समोर घटना
पुणे
पुण्यात महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला आहे.फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशनच्या समोर ही घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. दरम्यान पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. या प्रकरणात विश्रामबाग पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. संजय फकिरा साळवे असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशनच्या समोर ड्रंक आणि ड्राईव्ह प्रकरणात कारवाई सुरू असताना ही घटना घडली. आरोपी संजय फकिरा साळवे राहणार पिंपरी चिंचवड (मूळगाव- जालना) याने महिला पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. आरोपीनं दारू पिऊन हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
एका पोलीस अधिकाऱ्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. विशेष म्हणजे वाहतूक पोलीस स्टेशनसमोरच हा प्रकार घडला आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे या महिला अधिकाऱ्याचा जीव वाचला आहे. या प्रकरणात विश्रामबाग पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.
