श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज बाद


वाराणसीतून मोदींच्या विरोधात ठोकला होता शड्डू
वाराणसी
उत्तर प्रदेशातील वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवणारा कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे.श्याम रंगीला याने मंगळवारी अर्ज भरला होता. त्यानंतर आज त्याचा अर्ज अवैध ठरवण्यात आला. राजकारण आपलं क्षेत्र नाही, कॉमेडी करणं हेच आपलं काम असल्याची भावुक प्रतिक्रिया श्याम रंगीला यांनी दिली.
वाराणसीमधून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर श्याम रंगीलाच्या अर्जाची बुधवारी छानणी करण्यात आली. त्यानंतर त्याचा अर्ज बाद ठरवण्यात आला. त्यानंतर श्याम रंगीलाने सांगितलं की, सर्व पेपर्स आणि आवश्यक गोष्टी लक्षात घेऊन आम्ही अर्ज भरला होता. मात्र उमेदवारी अर्ज भरताना घेतलेल्या शपथेती पूर्तता आपल्याकडून झाली नसल्याचं सांगत आपला अर्ज बाद करण्यात आला.
कदाचित मला गंगा मातेचा आशीर्वाद मिळाला नसेल, त्यामुळेच आपला अर्ज बाद झाल्याचं श्याम रंगीला याने सांगितलं. त्याचवेळी वाराणसी जिल्हा प्रशासनावर नामांकन प्रक्रियेत गोंधळ घातल्याचा आरोप त्याने केला.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!