41 औषधांच्या किमती झाल्या कमी


केंद्र सरकारच्या निर्णयामुळे रूग्णांना मोठा दिलासा
नवी दिल्ली
केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून काही आजारांवर कामी येणाऱ्या औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये केंद्र सरकारने 41 औषधं आणि 6 फॉर्म्युलेशनच्या किमतीत घट केली आहे. शुगर, हृदय, यकृत, अँटासिड, संसर्ग, ऍलर्जी, मल्टीविटामिन, अँटीबायोटिक्सच्या किंमती निश्चित करण्यात आल्या आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे 41 औषधे स्वस्त होणार आहेत.
नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग अथॉरिटी ऑफ इंडियाच्या 143 व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी यासाठी गॅझेट नोटीफिकेशन जारी करण्यात आली आहे.ही एक सरकारी नियामक संस्था आहे. ही संस्था भारतातील फार्मास्युटिकल औषधांच्या किमती नियंत्रित आणण्याचं काम करते. या संस्थेच्या निर्णयामुळे आता काही औषधांच्या किमतीत घट करण्यात आली आहे.
भारतात 10 कोटींहून अधिक मधुमेहाचे रुग्ण आहेत. जगात सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण असलेल्या देशांमध्येही भारत आघाडीच्या स्थानावर आहे. यावेळी देशातील अनेक रूग्ण यासंदर्भातील औषधं आणि इन्सुलिनवर अवलंबून आहेत. अशावेळी या रूग्णांसाठी औषधांमध्ये झालेली घट दिलासा देणारी असणार आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!