साताऱ्यात आज स्वरागिनी गीतमैफल
सातारा
सातारा येथे दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सुजाता दरेकर प्रस्तुत स्वरागिनी या हिंदी व मराठी जुन्या गाण्यांचा कार्यक्रम सायंकाळी साडेपाच वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉलच्या सभागृहात होणार आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन लेखक व पत्रकार स्वप्निल पोरे यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद महासंघाचे उपाध्यक्ष काका पाटील महाराष्ट्र साहित्य परिषद पुण्याचे कार्यवाह शिरीष चिटणीस उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचा आस्वाद सर्वांनी घ्यावा असा असे आवाहन करण्यात आले आहे
