शून्य सावली दिवस साजरा
रयत सायन्स अँड इंनोवेशन ऍक्टिव्हिटी सेंटरचा उपक्रम
सातारा
विविध प्रकारच्या वैज्ञानिक उपक्रमांसाठी पुढाकार घेणाऱ्या येथील रयत शिक्षण संस्थेच्या रयत सायन्स अँड इंनोवेशन ऍक्टिव्हिटी सेंटरतर्फे शून्य सावली दिवस साजरा करण्यात आला माणसाची सावली त्याची पाठ कधी सोडत नाही असे म्हटले जात असले तरी वर्षातले दोन दिवस असे असतात की भर दुपारी सावली साथ सोडून जाते या दोन दिवसांना शून्य सावलीचा दिवस असे म्हणतात याची वैज्ञानिक याची माहिती देण्यासाठी रयत सेंटरमध्ये शून्य सावली दिवस साजरा करण्यात आला
सायन्स सेंटरचे इन्चार्ज संचालक डॉ. सारंग भोला यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले तसेच शून्य सावली दिवस कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर सुधीर कुंभार यांचेही त्यांनी स्वागत केले सुधीर कुंभार यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना शून्य सावली दिवसाचे महत्त्व सांगितले आणि त्याचे प्रात्यक्षिकही करून दाखवले सातारा शहरातील विविध विद्यालयातील 74 विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता सायन्स सेंटरचे क्युरेटर सचिन सोनुले यांनी आभार मानले
