नेहा पिसाळ यांचे निधन
सातारा
व्याजवाडी (ता.वाई )येथील संगणक अभियंता कुमारी नेहा रामदास पिसाळ( वय 28) यांचे अल्प आजाराने निधन झाले. जलसंपदा विभागातील निवृत्त अभियंता रामदास पिसाळ यांच्या त्या कन्या आणि किसन वीर कारखान्याचे माजी संचालक रोहिदास पिसाळ आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव पिसाळ यांच्या त्या पुतणी होत.
एक बुद्धिमान , गुणी, सालस लोभस युवती अकाली गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आज सोनेश्वर येथे अंत्यविधी प्रसंगी मोठ्या संख्येने विविध क्षेत्रातील मान्यवर,आप्तेष्ट उपस्थित होते.

