20 मे पासून चार दिवसाचा समर कॅम्प
रयत सायन्स अँड ऍक्टिव्हिटी सेंटरचा उपक्रम
सातारा
रयत शिक्षण संस्थेच्या रयत सायन्स अँड इंनोवेशन ऍक्टिव्हिटी सेंटरतर्फे २० मे ते 23 मे या कालावधीमध्ये चार दिवसाच्या समर कॅम्पचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सायन्स सेंटरचे इन्चार्ज डायरेक्टर डॉक्टर सारंग भोला यांनी दिली हा समर कॅम्प येथील सेंटरच्या कार्यालयातच होणार आहे ४ दिवसांच्या या समर कॅम्प साठी 350 प्रवेश शुल्क असून या कालावधीमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना योगा मेडिटेशन शिकवले जाणार आहे तसेच विविध प्रकारचे सांस्कृतिक उपक्रमही राबवले जाणार आहेत यामध्ये आकाश दर्शनासारखा अनुभव विद्यार्थ्यांना देण्यात येणार असून लिक्विड नायट्रोजन शोचे ही आयोजन करण्यात आले आहे याव्यतिरिक्त ट्रेकिंग आणि विविध वैज्ञानिक प्रयोग कथाकथन नृत्य आणि गायन असे विविध कार्यक्रम या चार दिवसांच्या कॅम्पमध्ये होणार आहेत इयत्ता सातवी ते नववीतील विद्यार्थ्यांसाठी हा समर कॅम्प खुला असून सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे सातारा शहर परिसरातिल शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा अशी रावण डॉक्टर सारंग भोला यांनी केले आहे
