मे महिन्यामध्ये बँकाना १२ दिवस सुट्टी


नवी दिल्ली :
मे महिन्यात देशातील बँकांना एकूण १२ दिवस सुट्या राहणार आहेत. मात्र, या सर्व सुट्या देशाच्या सर्वच भागात राहणार नाहीत. राज्यानुसार, त्या कमी जास्त होतील. भारतीय रिझर्व्ह बँक, तसेच राज्य सरकारांनी मे २०२४ मधील सुट्यांची यादी जाहीर केली आहे.चौथा शनिवार आणि रविवारच्या सुट्यांसह एकूण १२ सुट्या त्यात आहेत. काही राज्यांत लोकसभा निवडणुकांसाठी देण्यात आलेली सुटी, रवींद्रनाथ टागोर जयंती, बसव जयंती, बुद्ध जयंती, नजरुल जयंती आणि अक्षय तृतीया, आदी सुट्यांचा त्यात समावेश आहे.

Advertisement

१ मे महाराष्ट्र दिन, कामगार दिन (महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा तसेच इम्फाळ, कोची, कोलकता, पणजी, पाटणा आणि तिरुवनंतपूरम)
५ मे रविवार
८ मे रविंद्रनाथ जयंती (कोलकता)
१० मे बसव जयंती, अक्षय तृतीया
११ मे दुसरा शनिवार
१२ मे रविवार
१६ मे राज्य दिन
१९ मे रविवार
२० मे लोकसभा निवडणूक (काही ठिकाणी)
२३ मे बुद्ध पौर्णिमा
२५ मे नजरुल जयंती
२६ मे रविवार


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!