श्यामची आई पुस्तकातील विचार सर्वकालीन
वसंत व्याख्यानमालेत डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांचे उद्गार
सातारा
साने गुरुजींच्या लेखणीतून उतरलेले श्यामची आई हे पुस्तक सर्वकालीन उपयुक्त असून आधुनिक काळामध्ये सुद्धा या पुस्तकातील विचारांची उपयुक्तता संपलेली नाही श्यामची आई हे पुस्तक काल होते आज होते आणि उद्याही राहील असे उद्गार ज्येष्ठ लेखिका वंदना बोकील कुलकर्णी यांनी काढले
येथील ज्ञानविकास मंडळाचे आयोजित केलेल्या वसंत व्याख्यानमालेत श्यामची आई काल ,आज आणि उद्या या विषयावर पहिले पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या
प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सुयोग दांडेकर उपस्थित होते
वंदना बोकील कुलकर्णी म्हणाल्या , श्यामची आई हे पुस्तक बाल वाङ्मय असल्याचा गैरसमज प्रथम सगळ्यांनी काढून टाकायला हवा कारण हे पुस्तक लहान मुलांप्रमाणेच त्यांच्या पालकांसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे कारण साने गुरुजींनी या कादंबरीवजा आत्मचरित्रातून आपण आपल्या आईच्या माध्यमातून आणि संस्कारातून कसे घडलो हे दाखवून दिले आहे

श्यामची आई या पुस्तकातील विविध प्रसंगांचा दाखला देऊन वंदना बोकील यांनी आजही या प्रसंगातून समोर येणारे विचार कसे उपयुक्त ठरू शकतात हे स्पष्ट केले नेहमी खरे बोलावे अस्पृश्यता पाळू नये इतरांना मदत करावी प्रसंगी कठोर होऊन कर्तव्य पार पाडावे अशा प्रकारचे विविध मार्गदर्शन श्यामची आई पुस्तकामधून श्यामच्या आईने केले आहे आणि आजही ते उपयुक्त आहे असेही त्यांनी सांगितले
इतक्या वर्षानंतरही श्यामची आई या पुस्तकाचे आकर्षण संपलेले नाही कारण त्या पुस्तकातील विचार आजही उपयुक्त आहेत आणि त्या आधारे आपण आदर्श जीवन जगू शकतो असे त्यानी आवर्जून सांगितले
ज्ञानविकास मंडळाचे प्रसाद चाफेकर यांनी प्रारंभी वसंत व्याख्यानमालेमागील उद्देश स्पष्ट केला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर सुयोग दांडेकर यांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला
