नोबेल साहित्य दर्शन पुस्तकाचा लोकार्पण सोहळा


वाचकांच्या जाणिवांच्या कक्षा रुंद करणारे पुस्तक:श्रीपाल सबनीस
पुणे
डॉक्टर अश्विनी धोंगडे लिखित नोबेल साहित्य दर्शन या पुस्तकाचा लोकार्पण सोहळा पुण्यात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी नोबेल साहित्यात अनेक व्यामिश्र भावभावनांची, घटना प्रसंगांची गुंतागुंत आहे तसेच प्रज्ञा आणि प्रतिभा यांचा संगम अशा साहित्यातून होतो .अशा प्रकारचे हे मराठीतले पहिलेच पुस्तक आहे आणि ते मराठी वाचकांच्या जाणिवांच्या कक्षा अधिक रुंद करेल यात शंका नाही असे उद्गार काढले.
प्राध्यापक डॉक्टर सुनीलकुमार लवटे यांनी नोबेल साहित्या विषयी काही मूलभूत विचार मांडून अनुवादकांनाही या रकमेचा निम्मा हिस्सा मिळायला पाहिजे आणि त्यांचे नाव पहिल्या पानावर यायला हवे यासाठी दिलेल्या लढ्याची माहिती दिली.
हे पुस्तक लिहिण्यामागची आपली भूमिका व्यक्त करताना डॉक्टर अश्विनी धोंगडे म्हणाल्या ही हे साहित्य वाचताना मला जी अस्वस्थता आली आणि त्यातून एका अनामिक आनंदाचा प्रत्यय आला त्यात माझ्या मराठी वाचकांना वाटेकरी करावे म्हणून या पुस्तकात मी गेल्या 30 वर्षातील 10 नोबेल साहित्यकृतींचा रसास्वादात्मक परिचय या पुस्तकात करून दिला आहे. विश्वसाहित्याच्या एका महत्त्वाच्या दालनाचे ‘दर्शन’ घडवणाऱ्या ह्या पुस्तकातून वाचकांना साहित्यातून प्रतीत होणारे ‘जीवनभान’ समजून येईल. लेखनाच्या मांडणीच्या दृष्टीनेही हे पुस्तक वेगळेपण जपणारे आहे.
मराठी किंवा भारतीय साहित्याबरोबरच विश्वसाहित्याचा तौलनिक अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यासाठी आणि अनुवाद क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हे पुस्तक तसेच ह्याचे आगामी भाग पुढील पिढीसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरतील, असे लेखक, व्याख्याता डॉ. निर्मोही फडके आपल्या विवेचनात म्हणाल्या.
कार्यक्रमाचे आयोजक दीपलक्ष्मी नागरी पतसंस्थेचे चेअरमन शिरीष चिटणीस यांनी पुस्तकाचे वैशिष्ट्य सांगून काही कलाकृतींचे विश्लेषण केले. श्रीनिवास शारंगपाणी यांनीही पुस्तकावर आपले मत व्यक्त केले.
स्वप्नील पोरे यांनी प्रास्ताविक केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!