शरद पवार धर्मनिरपेक्ष नाहीत


प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Advertisement

मुंबई
शरद पवार हे धर्मनिरपेक्ष असल्याचं खोटं सांगत आहेत. शरद पवार सेक्युलर नाहीत .मी त्यांना सेक्युलर मानत नाही. ते संधीसाधू आहेत, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तर उद्धव ठाकरे हे धर्मवादी आहेत हे उघड आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
टीव्ही9 मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी शरद पवार यांच्याबाबतचा दावा केला आहे.
यावेळी आंबेडकर यांनी राज्यात राजकीय भूकंप होणार असल्याचे संकेत दिले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे हे भाजपसोबत जातील. त्यांच्यामागे चौकशीचा सिसेमिरा आहे. शिवाय त्यांना राजकीय पुनर्वसन करून घ्यायचं आहे. त्यामुळे त्यांना भाजपसोबत जाण्याशिवाय गत्यंतर नाही. तर, शरद पवार हे संधीसाधू राजकारणी आहेत. तेही भाजपसोबत जातील, असा दावा आंबेडकर यांनी केला आहे.
दरम्यान, कालच्या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. 2014 आणि 2019 मध्ये भाजप 70 ते 72 टक्क्यांवर निवडणुका घेऊन गेले होते. ते आता 50 आणि 60 टक्क्यांवर आले आहे. मतदान कमी झाले आहे याचा फटका भाजपला बसणार आहे. आता ते 400 पार नव्हे 250 पर्यंत आलेले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीमधील तमाशा आपण बघत आहोत. बाप एका पक्षात तर पोरगा दुसऱ्या पक्षात आहे. सत्ता आपल्या कुटुंबातून जाता कामा नये अशी परिस्थिती आहे. शिवसेना(ठाकरे) यांची महाविकास आघाडीसोबत युती झाली आहे असे सगळ्या प्रचार सभेत सांगितले जाते, पण मुंबईच्या कोणत्याही सभेत राष्ट्रवादी (शरद पवार) यांचा कार्यकर्ता दिसत नाही आणि काँग्रेसचे कार्यकर्ते देखील दिसत नाहीत. कदाचित मुंबईमध्ये तमाशा होणार आहे आणि या पक्षाचे तीनही नेते या तमाशात सहभागी असतील, असा दावाही त्यांनी केला


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!