४ मे ला वन डे समर कॅम्प
रयत सायन्स आणि इनोवेशन ऍक्टिव्हिटी सेंटरतर्फे आयोजन
सातारा
रयत शिक्षण संस्थेच्या रयत सायन्स आणि इनोवेशन ऍक्टिव्हिटी सेंटर तर्फे चार मे रोजी एक दिवसाचा समर कॅम्प आयोजित करण्यात आला आहे इयत्ता चौथी ते सहावी या वयोगटातील 30 विद्यार्थ्यांनाच या समर कॅम्पला प्रवेश देण्यात येणार असूनचार मे रोजी सकाळी दहा ते दुपारी साडेचार या कालावधीमध्ये हा कॅम्प होणार आहे वर्ये येथील रयत सायन्स आणि नॅशनल ऍक्टिव्हिटी सेंटर येथेच हा कॅम्प घेतला जाणार आहे कागदापासून खेळणी तयार करणे आणि अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम या कॅम्पमध्ये केले जाणार आहेत या कॅम्पसाठी शंभर रुपये शुल्क असून सहभागी विद्यार्थ्यांनी येताना आपला जेवणाचा डबा घेऊन यायचा आहे बाकी सर्व व्यवस्था सेंटर तर्फे केली जाणार आहे अशी माहिती ऍक्टिव्हिटी सेंटरचे इन्चार्ज डायरेक्टर डॉक्टर सारंग भोला यांनी दिली अधिक माहितीसाठी 8605145013 नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे
